जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दुकानास आग,लाखो रुपयांचे नुकसान,गुन्हा होणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या कोहिनुर स्टोअरच्या गोदामास रात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने भाडे चुलत्या ऐवजी आपल्याला देत नाही याचा राग मनात धरून आग लावली असून यात सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील आरोपीने या आधी रात्री नऊ वाजेच्या सूमारास प्रयत्न केला होता मात्र तो जागृत नागरिकांनी हाणून पडला होता.त्यानंतर त्यास नागरिकांनी त्या ठिकाणाहून त्यास परत पाठवले होते.मात्र त्यास त्याबाबत टोकाचा राग असल्याने त्याने मध्यरात्री सर्वांना हुलकावणी धुऊन पुन्हा एकदा प्रयत्न करून हि कृती केली असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.त्या पुतण्यास पत्नीसह दुपारी चुलत्याने पडकून शहर पोलीस ठाण्यात आणले होते.मात्र त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने भिंतीवरून उडी मारून पोबारा केला असल्याची माहिती हाती आली आहे.

या प्रकरणी दुकानांचे मालक विशाल विजय नानकर (वय-२९) गोकुळनगरी कोपरगाव हे आपले,’कोहिनुर स्टोअर’ हे दुकान अनेक वर्षांपासून चालवत आहे.मात्र ते त्यांना पुरेसे ठरत नसल्याने त्यांनी आरोपीच्या चुलत्याकडून शेजारी असलेले गोदाम भाडोत्री घेतले होते.मात्र भाडे देताना मूळ मालक आणि त्यांचा पुतण्या यांच्यात मतभेद असल्याची माहिती आहे.त्यातून,”चुलत्या ऐवजी मला गोदामाचे भाडे द्या” असा हट्ट पुतण्याने धरला होता अशी माहिती हाती आली आहे.त्यातून दुकानदाराने त्यास,”तुम्ही तुमच्यात एकमत करा मला कोणालाही भाडे द्यायचेच आहे,मला काही फरक पडत नाही” अशी भूमिका घेतली होती.मात्र ती आरोपीच्या पचनी पडली नव्हती त्यातून हा प्रताप घडला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

त्याने आधी रात्री नऊ वाजेच्या सूमारास प्रयत्न केला होता मात्र तो जागृत नागरिकांनी हाणून पडला होता.त्यानंतर त्यास नागरिकांनी त्या ठिकाणाहून त्यास परत पाठवले होते.मात्र त्यास त्याबाबत टोकाचा राग असल्याने त्याने मध्यरात्री सर्वांना हुलकावणी धुऊन पुन्हा एकदा प्रयत्न करून दि.२५ जुलै रोजी रात्री ०१ वाजता कहार गल्लीत हि कृती केली असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.यात त्यांचे वह्या,पुस्तके,छत्री,व्हाईट नोटीस बोर्ड,आदी स्टेशनरी साहित्य जाळून खाक झाले आहे.गुन्ह्यात किती नुकसान झाले याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३४५/२०२३ भा.द.वि.कलम ४३६ प्रमाणे आरोपी विक्रम मधुकर मेहरे रा.जंगली महाराज आश्रमाजवळ कोकमठाण याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करत आहेत.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव नगरपरिषदेमार्फत अग्निशामक बंब आग विझविण्यासाठी पाचारण केले होते.त्यांनी मोठया प्रयत्नाने दोन तासांनी हि आग आटोक्यात आणली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु केले आहे.त्यात आरोपी निष्पन्न होणार आहे.त्यामुळे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close