जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कृत्रिम बुद्धीमतेच्या आधारे आता रुग्णांवर उपचार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबईः

आजारी पडल्यास तुम्ही डॉक्टरकडे जाण्यास प्राधान्य द्याल की मोबाइल ऍप्स वापराल,जे तुमच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने डॉक्टरांप्रमाणे उपचार करू शकतात,असा प्रश्‍न विचारल्यास उत्तर देताना गोंधळल्यासारखं होईल.वास्तविक,आता जगात औषधोपचार देणार्‍या ऍप्सची संख्या झपाट्याने वाढत असून अनेक देशांमध्ये या ऍप्सचं नियमन करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

ब्रिटनच्या ‘नेचर’ या प्रसिद्ध विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार,२०२० मध्ये अमेरिकेत मानसिक आरोग्याशी संबंधित ऍप्स ४० लाख वेळा डाउनलोड केली गेली. ही सर्व ऍप्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित आहेत.महत्वाची बाब म्हणजे हा उद्योग झपाट्याने विकसित होत आहे. २०२६ पर्यंत जगातल्या ‘एआय बेस्ड हेल्थकेअर ऍप्स’चा हा उद्योग ३७ अब्ज डॉलर म्हणजेच दोन लाख ८० हजार कोटी रुपयांचा असेल.

भारतासह अनेक देशांमध्ये बनवलेल्या वैद्यकीय ऍप्सचं नियमन करण्यासाठी नवीन धोरण बनवण्यावर काम सुरू झालं आहे.याशिवाय अशी ऍप्स आता कॅनडा, ब्रिटन,फ्रान्स,ऑस्ट्रेलिया आणि भारतात उपलब्ध आहेत,जी अनेक आजार बरे करण्याचा दावा करतात.यापैकी लोकांना सर्वात जास्त आवडणारी ऍप्स मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत.ब्रिटनच्या ‘नेचर’ या प्रसिद्ध विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार,२०२० मध्ये अमेरिकेत मानसिक आरोग्याशी संबंधित ऍप्स ४० लाख वेळा डाउनलोड केली गेली. ही सर्व ऍप्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित आहेत.महत्वाची बाब म्हणजे हा उद्योग झपाट्याने विकसित होत आहे. २०२६ पर्यंत जगातल्या ‘एआय बेस्ड हेल्थकेअर ऍप्स’चा हा उद्योग ३७ अब्ज डॉलर म्हणजेच दोन लाख ८० हजार कोटी रुपयांचा असेल.

एखाद्या यंत्राने मानवाप्रमाणे विचार करण्याची,समजून घेण्याची,बोलण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित केल्यास त्या तंत्रज्ञानाला,’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तंत्रज्ञान मानवी मेंदूप्रमाणे काम करतं.आता त्याचा उपयोग लोकांवर उपचार करण्यासाठीही केला जात आहे.नुकतंच ब्रिटनमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित ऍप लॉंच करण्यात आलं आहे.ते रुग्णांची लक्षणं आणि त्यांच्याकडून काही प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतल्यानंतर रोगाचं निदान करतं.एखाद्या व्यक्तीला अनेक दिवस सतत खोकला येत असेल आणि त्याला टीबीचा आजार आहे असं वाटत असेल तर तो या ऍपवर ‘लॉग इन’ करेल आणि त्यानंतर त्याला त्याच्या खोकल्याच्या आवाजाचे नमुने या ऍपवर रेकॉर्ड करावे लागतील.वेगवेगळ्या वेळी आठ ते दहा नमुने गोळा केल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हे ऍप त्या रुग्णाला ‘टी.बी.’ आहे की नाही हे सांगेल.या शिवाय या तंत्राच्या मदतीने त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील हावभावांचाही अभ्यास केला जाईल.त्यानुसार रुग्णाला त्याच्या लक्षणांशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरंही द्यावी लागतील.

सध्या जगात अशी फार कमी ऍप्स आहेत.रोग ओळखल्यानंतर लगेचच योग्य आणि अचूक उपचार सांगणारी फारशी ऍप्स नसली तरी अमेरिका आणि कॅनडामध्ये अशा ऍप्सचा वापर केला जात आहे.रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात असं ऍप यशस्वी ठरल्यास ते वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल ठरेल.कारण आजही जगात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे,जे कधीच डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.उदाहरणार्थ, एकट्या भारतात दर ८३४ लोकांमागे एक डॉक्टर आहे.आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे आजारी असताना डॉक्टरांकडून उपचार घेऊ शकत नाहीत; मात्र ऍपने योग्य परिणाम दिल्यास प्रत्येक व्यक्ती उपचारापर्यंत पोहोचू शकेल.

अर्थात याचा अर्थ असा नाही की हे ऍप पूर्णपणे रुग्णालयं आणि डॉक्टरांची जागा घेऊ शकतात.अशी ऍप्स चेहर्‍यावरील हावभाव पाहून तुम्ही उदास आहात की तणावाखाली आहात हे सांगू शकतात.याशिवाय,तुमची लक्षणं जाणून घेतल्यानंतर,ती हेदेखील सांगू शकतात की तुम्हाला कोणता आजार आहे आणि त्यावर काय उपचार असावेत; पण याच्या मदतीने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता आणि तुम्हाला डॉक्टरांची गरज भासणार नाही असा दावा ही ऍप्स बनवणार्‍या कंपन्या देऊ शकलेल्या नाहीत.आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे गेल्या दशकात,मानवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी विकसित झाली आहे की लोक मानवांपेक्षा या तंत्रज्ञानावर आधारित उपकरणं आणि ऍप्सवर अधिक अवलंबून राहू लागले आहेत; मात्र मानवी बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या लढाईत मानवाला कमी लेखणं हीदेखील मोठी चूक ठरू शकते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close