जाहिरात-9423439946
आरोग्य

उन्हाळ्यात होतात सर्वाधिक गर्भपात !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबई :

आई-वडील होणं हा जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो असं म्हणतात.नवा जीव जन्माला घालणं,त्याला मोठं होताना बघणं ही सर्वांसाठीच आनंदाची बाब असते; मात्र ‘मिसकॅरेज’मुळे तो आनंदाचा क्षण दु:खात रुपांतरित होऊ शकतो.उन्हाळ्याच्या काळात महिलांमध्ये ‘मिसकॅरेज’च्या शक्यता वाढू शकतात अशी धक्कादायक माहिती ‘बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ (बीयूएसएचपी)च्या अभ्यासातून समोर आली आहे.

उत्तर अमेरिकेत,उन्हाळ्याच्या काळात,विशेषत: ऑगस्ट महिन्यात,आठ आठवड्यांच्या आत होणार्‍या गर्भपाताचा धोका ४४ टक्के अधिक आहे.फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे; मात्र प्रेग्नन्सीच्या कोणत्याही आठवड्यात ‘मिसकॅरेज’ होण्याचं प्रमाण फेब्रुवारी महिन्यापेक्षा ऑगस्टच्या शेवटी अधिक आहे.दक्षिण आणि मध्यपूर्व भागात कडकडीत उन्हाळा असतो तेव्हा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात ‘मिसकॅरेज’चं प्रमाण अधिक असतं.

‘बीयूएसएचपी’च्या मते,३० टक्क्यांपर्यंतच्या गर्भधारणांचा शेवट गर्भपातात होतो. अपत्यप्राप्तीच्या २० आठवड्यापूर्वीच गर्भपात झाल्यास त्याला गर्भधारणेचं नुकसान (प्रेग्नन्सी लॉस) म्हणून संबोधलं जातं. त्यापैकी अर्ध्याहून जास्त ‘मिसकॅरेज’चं कारण कळू शकत नाही; मात्र त्यामधल्या धोक्यांमुळे ‘पोस्ट-ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, डिप्रेशन’ आणि ‘अँक्झायटी’ असे अनेक परिणाम महिलांच्या आरोग्यावर होऊ शकतात. ‘एपिडेमिलॉजी’ या जर्नलमध्ये हे निष्कर्ष छापून आले आहेत. तापमानानुसार ‘मिसकॅरेजेस’चे धोके,या विषयाचा त्यात अभ्यास करण्यात आला आहे.उत्तर अमेरिकेत,उन्हाळ्याच्या काळात,विशेषत: ऑगस्ट महिन्यात,आठ आठवड्यांच्या आत होणार्‍या गर्भपाताचा धोका ४४ टक्के अधिक आहे.फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे; मात्र प्रेग्नन्सीच्या कोणत्याही आठवड्यात ‘मिसकॅरेज’ होण्याचं प्रमाण फेब्रुवारी महिन्यापेक्षा ऑगस्टच्या शेवटी अधिक आहे.दक्षिण आणि मध्यपूर्व भागात कडकडीत उन्हाळा असतो तेव्हा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्यात ‘मिसकॅरेज’चं प्रमाण अधिक असतं.

कडक उन्हाळा,तापमानातले बदल तसंच बदलती जीवनशैली आणि मिसकॅरेज यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज असल्याचंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.एखाद्या हंगामातली,ऋतूतली भिन्नता,त्याचे परिणाम पाहिल्यास त्यामागची कारणं लक्षात येतात, असं ‘बीयूएएचपी’मधील एपिडेमीलॉजीच्या रिसर्च असिस्टंट प्रोफेसर,डॉ.मेलिया वेसलिंक यांनी सांगितलं.कडकडीत उन्हाळा असतो तेव्हा ‘मिसकॅरेजेस’चा धोका अधिक होता असं आम्हाला आढळलं.उन्हाळ्याच्या काळात नेमके कोणते घटक ‘मिसकॅरेज’ला कारणीभूत ठरतात हे शोधावं लागेल असं डॉ.वेसलिंक यांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close