जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात १४४ ची ऐसी तैसी,भाजीपाला मार्केटमध्ये गर्दी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनापासून राज्यातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी कोपरगावसह राज्यात मुख्यमंत्र्यांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केलेले असताना कोपरगाव शहरात भाजी मार्केट मध्ये काल नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती त्यामुळॆ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या जमावबंदीची ऐसितैसी पाहावयास मिळाली आहे.त्यातून कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान या बाबत जनतेत अद्याप अपेक्षित जनजागृती झालेली दिसत नसल्याने शहर पोलिसांना आपला दंडा दाखवावा लागणार अशीच लक्षणे दिसत आहेत.कारण ज्यांना संकेतांची भाषा समजत नाही त्यांना पोलिसांच्या काठीची भाषा समजत असते.त्याची योग्य वेळ आल्याचे दिसत असल्याची लक्षणे आहेत.

देशभरात कोरोनाचे आजपर्यंत ४१८ रुग्ण आढळले असून राज्यात हीच संख्या ७५ वर गेली आहे.तर बळींची संख्या ३ झाली आहे.इटलीत या विषाणूच्या संसर्गाने दररोज सातशेच्या वर नागरिक आपल्या प्राणास मुकत आहेत.हि आकडेवारी धक्कादायक आहे.अमेरिकेतही हजारोंच्या संख्येत वाढत आहे.प्रगत देशांनी या विषाणू पुढे हात टेकले असताना भारतासारख्या देशाने दक्षता घेणे किती आवश्यक आहे.हि बाब स्पष्ट झाली असतानाही नागरिक अद्याप त्या बाबत अत्यंत निष्काळजी दिसून येत आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.नाही म्हणायला सोमवार हा आठवडे बाजाराचा वार आहे.मात्र तरीही भाजी मार्केट मध्येच भाजीपाला घेतला पाहिजे असा काही नवस नाही.त्यासाठी नगरपरिषदेने गावात फेरीच्या रूपाने विक्री करण्यास परवानगी दिली त्याचा लाभ घेण्याची तसदी कोणीही तयार नाही.त्यामुळे या बाबत तालुका प्रशासनाने व कोपरगाव नगरपरिषदेने जागृती करूनही कुठलाही उपयोग झाल्याचे दिसत नाही.त्यामुळे हे आव्हान संपुष्टात आणायचे काम कोण करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कमलाबाई मधुकर करमोगटे हि साधारण पन्नाशीतील महिला आपले कांदे विकत होते तिला इटलीतील शेकडोतील कोरोनाची मृत्यूची जाणीव करून दिली व तिथे कोणीही कोणाच्या अंत्यविधीला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिली व याबाबत विचारणा केली असता तिने,”भीती कोणाला वाटत नाही,दुसऱ्याच्या सरणावर कशाला कोण जाईल ? अशीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने भाजीमार्केटची सैर केली असता तेथे असलेल्या जेऊर कुंभारी येथील बाळासाहेब लिंभोरे या भाजी विक्रेत्यास या बाबत छेडले असता त्याने आपण अपघातात जखमी झालो होतो दवाखान्यात पट्टी बदलण्यास आलो म्हणून असलेला भाजीपाला सोबत आणल्याची बतावणी केली.तर दुसरा शेतकरी ब्राह्मणगाव येथील असून सुनील वाकचौरे यांना, तुम्हाला कोरोनाची भीती वाटत नाही का ? असा सवाल केला असता,” त्यांनी भीती तर वाटते पण पोट कसे भरणार ? असा सवाल उपस्थित करून आपली अपरिहार्यता व्यक्त केली आहे.संवत्सर येथील सलीम तांबोळी हा पानाचा व्यापारी बसलेला होता त्याला हाच सवाल विचारला असता,त्याने आपण पंधरा दिवसाचा माल खरेदी केला असल्याने तो विकणे अपरिहार्य असल्याचे सांगितले.खरे तर हा माल घरोघरी जाऊन विकण्याचा नाही अशी सबब पुढे केली.तर कमलाबाई मधुकर करमोगटे हि साधारण पन्नाशीतील महिला आपले कांदे विकत होते तिला इटलीतील शेकडोतील कोरोनाची मृत्यूची जाणीव करून दिली व तिथे कोणीही कोणाच्या अंत्यविधीला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिली व याबाबत विचारणा केली असता तिने,”भीती कोणाला वाटत नाही,दुसऱ्याच्या सरणावर कशाला कोण जाईल ? अशीच प्रतिक्रिया अशोक राधु मालकर या टाकळीच्या काकडी विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.तर नंदा सूर्यवंशी या गांधींनगरच्या गाठीकडे विकणाऱ्या महिलेने आपल्याला नगरपरिषदेच्या सरांनी सांगितले आहे म्हणूनच आपण मुख्य बाजारापासून अलिप्त बसलो असल्याचे पुष्टी केली आहे.

दरम्यान या बाबत जनतेत अद्याप अपेक्षित जनजागृती झालेली दिसत नसल्याने शहर पोलिसांना आपला दंडा दाखवावा लागणार अशीच लक्षणे दिसत आहेत.कारण ज्यांना संकेतांची भाषा समजत नाही त्यांना पोलिसांच्या काठीची भाषा समजत असते.त्याची योग्य वेळ आल्याचे दिसत असल्याची लक्षणे आहेत.दरम्यान शहरात मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच आढळून आली. मात्र डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर मात्र फळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले दिसून आले.शहरात रस्ते बऱ्यापैकी गजबजलेले दिसून आले आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close