जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात ९० जण परदेशातून आले !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना अद्यापही कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना या आजाराचे गांभीर्य समजलेले नाही असे दिसत असून या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने तालुक्यात किती नागरिक परदेशातून भारतात आले याची अधिकृत माहिती घेतली असता कोपरगाव शहरात ३७ तर तालुक्यात ५३ असे एकूण ९० नागरिक परदेशातून आपल्या मायभूमीत आले असून त्यांची तालुका प्रशासनाने प्राथमिक तपासणी केली असता त्यांना या विषाणूंचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही.

आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहरात व तालुक्यात असे परदेशातून किती नागरिक आले याची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता कोपरगाव शहरात आता पर्यंत परदेशातून ३७ नागरिक आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.तर तालुक्यात बाहेर देशातून ५३ नागरिक आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.तालुक्यात असे ९० नागरिक परदेशातून आले असले तरी त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोरोनाची लागण होऊन दुसरा टप्पा सुरु झाल्याने प्रशासन व नागरिक यांच्यात कोरोना या विषाणू बाबत मोठी दहशत आढळून येत आहे.त्यासाठी परदेशातून आलेले नागरिक.मुंबई-पूण्यातून आलेले नागरिक यांची विगतवरी करण्यात येत असून त्याची नोंद स्थानिक प्रशासनास ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.कोपरगाव तालुक्यात सांगवी भुसार येथे नुकताच एक नागरिक दुबईवरून आल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास मिळाली होती त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यास सतर्क केले असता तालुका प्रशासनाने त्या इसमास सकाळीच गाठून त्यास तपासणी करण्यास फर्मावले त्यावेळी त्याची धाडणी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहरात व तालुक्यात असे परदेशातून किती नागरिक आले याची माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता कोपरगाव शहरात आता पर्यंत परदेशातून ३७ नागरिक आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.तर तालुक्यात बाहेर देशातून ५३ नागरिक आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.तालुक्यात असे ९० नागरिक परदेशातून आले असले तरी त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत त्यात कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.तालुक्यात अद्याप तरी असा रुग्ण आढळला नसला तरी सावधानता हाच नागरिकांसाठी सर्वात मोठा बचाव असल्याने डोळे झाकून बसने वा शासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close