आरोग्य
कोपरगाव शहरात महिलेचे कोरोनाने निधन,पोहेगाव गटात सर्वाधिक रुग्ण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५३५ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात २१ रुग्ण बाधित आढळले असून ५१४ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५०० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०१ तर अँटीजन तपासणीत २१ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ११ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण ३३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १५ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.दरम्यान पोहेगाव जिल्हा परिषद गटात सर्वाधिक १५ तर कोपरगाव शहरात श्रध्दानगर येथील एक ६५ वर्षीय महिलेचे निधन झाले आहे.तर शहरात ११ रुग्ण बाधित आढळले आहे.हि संख्या अलीकडील काळातील मोठी आहे.
तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.मात्र शहरात ०२ रुग्ण आढळले आहे.त्यात वडांगळे वस्ती,अंबिका नगर येथे प्रत्येकी ०१ रुग्ण आढळले आहे. तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात आजही रुग्णवाढ सुरूच राहिली ती १५ एवढी आहे यात बहादरपुरात ०४ रुग्णांचा समावेश आहे.तर रांजणगाव देशमुख,जवळके,वेस प्रत्येकी-०३,धोंडेवाडी,अंजनापूर येथे प्रत्येकी -०१,दरम्यान वेस,सोयगावातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याची बातमी मिळत आहे.मात्र हे रुग्ण शेजारी राहाता.संगमनेर तालुक्यात उपचाहरार्थ भरती होत असल्याने त्यांच्या नोंदी तालुक्यात होत नाही.दरम्यान टाकळी,वारी प्रत्येकी-२,सडे,ओगदि, कासली,शिंगणापूर,चास नळी येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ९७८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १७२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५५ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ६८ हजार ७१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ७४ हजार ८४८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.२९ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ५८९ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.२२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख १७ हजार ६७९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार २८२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०४ हजार ७५८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ६३८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.