जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या गावात रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत रक्त दाब व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्याला ग्रामस्थानी चांगला प्रतिसाद दिला आहे.

‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत रुग्णांची रक्त दाब व रक्तशर्करा तपासणी करताना समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे,समवेत सरपंच सारिका थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,सदस्य मीना थोरात आदी दिसत आहेत.

दरम्यान ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत एप्रिल पासून उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे,स्वच्छता,शुद्ध पिण्याचे पाणी,सांडपाणी व्यवस्थापन,पोषण,तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार (उदा.मधुमेह,उच्च रक्तदाब) यांचे लवकर निदान करणे आदी उपक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचे मार्गदर्शनात राबवले जात असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे यांनी दिली आहे.

   महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले असून कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे या अभियानांतर्गत रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्याला ग्रामस्थानी चांगला प्रतिसाद दिला आहे.

‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत रुग्णांची रक्त दाब व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मान्यवर दिसत आहेत.

  सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,वाल्मीक भोसले,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,इंदुबाई नवनाथ शिंदे,रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे,नवनाथ शिंदे,तालुका कृषी अधिकारी सचिन कोष्टी,कनिष्ठ अभियंता राजेंद्र रोहोम,डॉ.रोहोम,ग्रामपंचायत अधिकारी परशरम हासे,रांजणगाव देशमुख येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश रोहोम,समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे,आरोग्य सेविका राणी लोखंडे,आरोग्य सेवक डॉ.पंकज गलगट,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड,गोरक्षनाथ शिंदे,रखमा वाकचौरे,रामनाथ थोरात,विठ्ठल थोरात,प्रशांत शिंदे,शिवाजी थोरात,पोपट थोरात,कानिफनाथ थोरात,बाळासाहेब थोरात,गोविंद गोसावी, दगु थोरात,अंगणवाडी सेविका मंगल नेहे आदीसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

   दरम्यान या उपक्रमाचे कोपरगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप आदींनी स्वागत केले आहे.

  दरम्यान ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे,स्वच्छता,शुद्ध पिण्याचे पाणी,सांडपाणी व्यवस्थापन,पोषण,तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार (उदा.मधुमेह,उच्च रक्तदाब) यांचे लवकर निदान करणे आदी उपक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचे मार्गदर्शनात राबवले जात असल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे यांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close