कोपरगाव तालुका
संस्कृती आणि सभ्यता भारतीय संस्कृतीचा भाग-नरेन दास
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“संस्कृती आणि सभ्यता आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे.त्यावरच आपले अस्तित्व अवलंबून आहे. आपण आपल्या वसुंधरेची निरंतर उपासना केली पाहिजे.किंबहुना त्यामुळेच आपले अस्तित्व टिकून असल्याचे प्रतिपादन ५७ महाराष्ट्र बटालियन नगरचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नरेन दास यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“गोदातरंग” वार्षिकांक हा आमच्या महाविद्यालयात वर्षभर संपन्न होणाऱ्या शैक्षणिक आणि इतर घडामोडींचे प्रतिबिंब आहे.गेल्या वर्षीच्या गोदातरंग अंकामध्ये विद्यार्थ्यांनी कोविड महामारी संदर्भात आपले विचार,अनुभव,कविता,लेख निबंध इ. उत्कृष्ट वाड्मय-निर्मिती केलेली आहे”-अशोक रोहमारे,अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ट महाविद्यालयाच्या गोदातरंग (२०२०-२१) वार्षिक अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे,सुजित रोहमारे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संतोष पगारे,आय.क्यू.ए.सी प्रमुख प्रा.व्ही.सी.ठाणगे,कला शाखा प्रमुख डॉ.के.एल.गिरमकर आदी प्राध्यापक वृंद तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी,एन.सी.सी छात्र तसेच एन.सी.सी.चे छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ज्या वसुंधरेवर आपण राहतो,त्या वसुंधरेचा वारसा आपण जपला पाहिजे.या वैश्विक उर्जेचे स्मरण ठेवून आपण त्याची उपासना केली पाहिजे.दररोज सकाळी केलेल्या या उपासनेमुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण होते.मनुष्याला आयुष्यात मुक्ती आणि यश तेव्हाच प्राप्त होते,जेव्हा तो त्याचे कर्तव्य तन-मन-धनापासून आणि एकाग्रतेने करतो.सध्याच्या कोविड महामारी काळात आपण खूपच अनिश्चित आणि वाईट अशा परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहोत.जिकडे-तिकडे चिंता,भिती आणि नैराश्याचे वातावरण आहे.परंतु तरीदेखील आपण प्राप्त झालेली माहिती प्रमाण न मानता आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून त्या माहितीचे आकलन करणे महत्त्वाचे आहे.केवळ अतिआत्मविश्वासातून संघर्षाचा आणि विनाशाचा जन्म होतो.याउलट आपण भीती आणि चिंतेचे जर संधीत रूपांतर केले तर आपला विजय निश्चित आहे.विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या ध्येयप्राप्तीतून मोठ्या ध्येयाकडे गेले पाहिजे तरच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतील” असेही शेवटी म्हणाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले तर गोदातरंग वार्षिक अंकाचे प्रमुख संपादक डॉ.जिभाऊ मोरे यांनी,”गोदातरंग कोविड महामारी विशेषांकाच्या रूपात प्रकाशित करताना कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,नवनाथ सोनवणे आदींचे सहकार्य लाभल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभागाच्या संपादक प्रा.वर्षा आहेर यांनी मानले.