आरोग्य
पोहेगाव जि.प.गटात रुग्णवाढ सुरूच,शहरात रुग्ण दर मंदावला
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५२३ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ११ रुग्ण बाधित आढळले असून ५१२ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४८९ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०१ तर अँटीजन तपासणीत ११ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ११ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण २३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ११ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
तर आज कोपरगाव शहरात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही मात्र सांगवी भुसार येथे एक ७२ वर्षीय महिलेचे निधन झाले आहे.तथापि कोरोना रुग्णांत नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात आजही रुग्णवाढ सुरूच राहिली ती ०९ एवढी आहे यात जवळकेत ०६ तर रांजणगाव देशमुख येथे ०३ रुग्णांचा समावेश आहे.तर रवंदे येथे ०२,कोकमठाण,मळेगाव थडी,सांगवी भुसार,वारी,पढेगाव,दहिगाव बोलका येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.तर कोपरगाव शहरात-०६ रुग्ण नोंदवले गेले आहे.मात्र शहरात एकही रुग्णाचे निधन झाले झाले नाही.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ८८८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १७७ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५६ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ६४ हजार ५१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०६ लाख ५८ हजार ०७६ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०८.४४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ४९५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.१७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख १३ हजार ७०६ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ९७५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख ०२ हजार १३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ५९८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,जवळके,बहादरपूर,अंजनापूर,रांजणगाव देशमुख आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या ०८ रुग्ण वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.।