कोपरगाव तालुका
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहाने संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असुन त्यामुळेच संस्कारक्षम समाजाची बांधणी होत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीपकुमार अजमरे यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ५सप्टेंबर डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात डाॕ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला तुपसैंदर डी.व्ही,एन.के.बडजाते ,जाधव ई.एल,कोताडे ए.जे.,अमृतकर ए.बी.,गवळे वाय.के. आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद,तसेच समता पतसंस्थेचे अक्षय कुलकर्णी,श्री.राजेंद्र धाकतोडे,श्री.अखिलेश आव्हाड.शिवाजी वाघमारे,सागर के.संतोष इखणकर सोशल डीस्टन्सिंग पाळुन उपस्थित होते.
या वेळी समता पतसंस्थेच्या कोपरगांव शाखाचे शाखाधिकारी आप्पासाहेब कोल्हे,गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर आणि उपस्थित शिक्षकांचा समता पतसंस्था वतीने सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.
शिक्षक विदयार्थीं घडवतांना पुर्ण मेहनत घेतात.शिक्षक समाज घडवतात त्यातुनच संस्कारक्षम समाजाची बांधणी होते असे प्रतिपादन श्री.दिलीपकुमार अजमेरे यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातुन घडलेल्या विदयार्थीमध्ये कुलगुरु पासुन ते आदर्श शिक्षकांची मोठी परंपरा आहे व हे विदयार्थी देश पातळीवर शाळेचे नांव उंचावत आहे असे त्यांनी सांगितले.
समताचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मी या शाळेचाच विदयार्थी असुन शाळेतील संस्कारामुळेच मी घडलो असे सांगितले.या वेळी सर्व शिक्षकांना गुलाबपुप्प देवुन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी पमुख्याध्यापक,रवी पाटील यांनी स्वागत केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोरे एस.डी यांनी केले.शेवटी पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले.