आरोग्य
कोपरगावात कोरोना हटला पण आता नवीन संकट दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
मार्च २०२१ पासून आजतागायत म्युकर मायकोसिसचे तब्बल १२ रुग्ण असून वर्तमानात ०५ रुग्ण सक्रिय आहे मात्र या रुग्णावर शासकीय खर्चातून उपचार सुरु आहे.यातील ०३ रुग्ण कोपरगाव तालुक्यातील असून बाकी रुग्ण बाहेरच्या तालुक्यातील आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असले तरी आता कोरोनासाथी बरोबर हि साथही ओसरली आहे”–डॉ.कृष्णा फौलसुंदर,वैद्यकीय अधीक्षक,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६३ हजार ०९० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार २४७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५३ हजार ७६० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ०८२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
म्युकर मायकॉसिस’चा समावेश साथीच्या रोगांमध्ये करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. तसंच त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केंद्राने राज्यांना जारी केल्या आहेत.
म्युकर मायकोसिस किंवा काळी बुरशी म्हणजे काय? हे आपण जाणून घेऊया.
कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात.
कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती या महिन्याच्या प्रारंभी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केलेली शनिवारची “जनता संचारबंदी” कापड व तत्सम व्यापाऱ्यांनी हरकत घेतल्याने वैतागून मागे घेतल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.विविध संघटना व कार्यकर्ते यांनी आपल्या सोयींनी वाराची मागणी केल्याने शहरात गोंधळ उडाला होता.त्यावर नगराध्यक्ष वहाडणे यांची हि संतप्त प्रतिक्रिया मानली जात आहे.त्यानंतर कोपरगाव व्यापारी महासंघ काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या बाबत डॉ.मुरूमकर पुढे बोलताना म्हणाले की,कोपरगाव तालुक्यात जवळपास दहा रुग्ण असून या रुग्णांची तपासणी आमच्या प्रयोगशाळेत झाली आहे.त्याबाबत आमच्याकडे अधिकृत आकडेवारी असून त्यात कोणताही संदेह असू नये.अशा प्रकारची तपासणी करणारी हि कोपरगाव.राहाता,येवला,सिन्नर,वैजापूर,आदी परिसरात हि एकमेव प्रयोगशाळा असून या ठिकाणी कोव्हिडच्या सावर्धिक तपासण्या झाल्या आहेत त्याच बरोबर याठिकाणी काळ्या बुरशीची तपासणीही होत असते.त्यामुळे आमच्याकडे अधिकृत माहिती असल्याचा दावाही त्यांनी आज केला आहे.व त्याबाबत सर्व दप्तर अधिकृत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.हा रोग माणसाला कोविड नंतर आलेल्या अशक्तपणामुळे निसर्गात कायम अस्तित्वात असलेली काळी बुरशी माणसावर हल्ला करते.जसे राजा कमजोर झाला की त्यातील एखादा सरदार त्याची अचानक सत्ता हस्तगत करतो तसाच हा प्रकार असतो.त्यामुळे ज्यांना कोविड होऊन गेला असेल त्यांनी काही काळ जपण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.आगामी काळात हि साथ वाढण्याचा धोकाही त्यांनी बोलून दाखवला आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागेल असा इशाराही त्यानी शेवटी दिला आहे.