शैक्षणिक
उत्तर नगर जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या उपस्थितीबत वाद !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नुकत्याच सुरु झाल्या असल्या तरी त्या शाळांच्या शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वाद निर्माण झाला असून शासन आदेश पन्नास टक्के उपस्थितीचा असताना राहाता व कोपरगाव तालुक्यात मात्र राजकीय दबावातून शिक्षण अधिकाऱ्यांनी मात्र शंभर टक्के उपस्थितीची अट लावल्याने शिक्षण संघटनांनी कोविड काळात साथीला बळी पडले तर याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल उपस्थित केला आहे.त्यामुळे या निर्णयाबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र उत्तर नगर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
“शिक्षण संचालकांचा आदेश हा पन्नास टक्के उपस्थितीचा आहे मात्र शिक्षण क्षेत्राचे कोरोना काळात मोठे नुकसान झाले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अनुशेष निर्माण झाला आहे.त्यामुळे दोन शिक्षकी शाळांचे एक शिक्षक उपस्थित राहिले तर गावात वाड्या वस्त्यांवर कोण जाईल व शाळेत कोण उपस्थित राहील असा सवाल विचारून त्यासाठी आम्ही ते काम सक्ती न करता शिक्षकांच्या सद्सद्विवेक बुद्धिवर सोडलें आहे”-पोपटराव काळे,तालुका शिक्षणाधिकारी,कोपरगाव.
गतवर्षी कोरोनाने जगभर कहर उडवून दिला होता आता कुठे कोरोनाची दुसरी लाट भारतात कमी झाली असल्याने शिक्षण विभागाने आपल्या शाळांची कवाडे नुकतीच किलकिली केली असून केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नुकत्याच मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांविना या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.त्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीची अट घातली आहे.तर अन्य शासकीय कार्यालयांना मात्र शंभर टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे.या भेदभावाचे कारण निष्पन्न झाले नसतानाच या उपस्थितीबाबत शिक्षण संघटनानीं प्रश्न उपस्थित केला आहे.व शासन आदेश जर पन्नास टक्के आहे.तर शिक्षण अधिकाऱ्यांनी शंभर टक्केही अट कोणत्या आधारावर लावली आहे.असा सवाल विचारला आहे.व उद्या जर शिक्षकांचे कोरोना साथीत काही भले बुरे झाले तर याला जबाबदार कोण ? असा रास्त सवाल विचारला आहे.त्यासाठी त्यांनी कोपरगाव तालुक्यातील पढेगावचे उदाहरण दिले आहे.व त्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना वाऱ्यावर सोडून दिल्याची आठवण करुन दिली आहे.मात्र शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दबावापोटी नाव न छापण्याची अट घातली आहे.त्यामुळे हा संघर्ष आगामी काळात कोणते वळण घेतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने राहाता व कोपरगाव तालुक्याचे तालुका शिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांचे संपर्क साधला असता त्यांनी शिक्षण संचालकांचा आदेश हा पन्नास टक्के उपस्थितीचा असल्याचा घटनेला दुजोरा दिला असून शिक्षण क्षेत्राचे कोरोना काळात मोठे नुकसान झाले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अनुशेष निर्माण झाला आहे.त्यामुळे दोन शिक्षकी शाळांचे एक शिक्षक उपस्थित राहिले तर गावात वाड्या वस्त्यांवर कोण जाईल व शाळेत कोण उपस्थित राहील असा सवाल विचारून त्यासाठी आम्ही ते काम शिक्षकांच्या सद्सद्विवेक बुद्धिवर सोडल्याचे सांगितलें आहे.त्यामुळे आगामी काळात शिक्षक संघटना काय भूमिका घेणार याकडे पालक शिक्षक यांचे लक्ष लागून आहे.