आरोग्य
कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या सर्वाधिक घटली !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ५८९ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०० हजार ७२१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १८१ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५६ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ५४ हजार ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख १९ हजार ८४४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २१.०९ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १० हजार ६८७ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९२.२२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ३७ हजार ६८५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १७ हजार ७५५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख १७ हजार ३०० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ६२९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
राज्यातील रुग्णवाढ प्रथमच पंचवीस हजारांच्या दरम्यान आली असून कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असून कोरोनाने बळी जाणाऱ्यात तरुणाईचा भरणा चिंता निर्माण करणारा आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान उद्या दिनांक २४ मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोवी शील्ड लसीचा पहिला डोस ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी तसेच शासकीय कर्मचारी यांच्या साठी ठेवण्यात आला आहे,सदर सत्रामध्ये लस द्यावयाच्या लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मार्फत दूरध्वनी करण्यात आला आहे. ज्या लोकांना तो आला असेल त्यांनीच जी वेळ दिली असेल त्यावेळेस आपल्या आधार कार्ड सह उपस्थित रहावे इतर कोणीही गर्दी करू नये अथवा चौकशीसाठी येऊ नये,जसजशी लस उपलब्ध होईल त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना लसीकरणासाठी बोलावले जाईल तरी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी शेवटी केले आहे.