जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी दूध संघातर्फे उत्पादकांसाठी मोफत चारा बियाणांचे वाटप करणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यामाने संघाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे वाटप करण्यात येत असून कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना याचा मोठा हातभार लागला आहे. दूध उत्पादकांनी चारा बियाणांचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“वर्तमानात दुधाचा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत निर्माण झालेली आहे.या शिवाय लॉकडाऊनमुळे हॉटेल्स,दुकाने,शाळा,महाविद्यालये,छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने दूध विक्री सुमारे ७० टक्क्यांनी कमी झाली आहे.शासन १०० टक्के दूध खरेदी करीत नसल्याने दुधाची साठवण करण्याची वेळ आली आहे.अशा परिस्थितीमुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत.त्यांना हातभार लावण्याच्या दृष्टीने संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने मोफत बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे”-राजेश पराजणे,अध्यक्ष गोदावरी-परजणे दूध संघ.

गोदावरी दूध संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या सहकार्याने सुमारे ३२ टन चारा बियाणे संघ कार्यस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे,त्यात ज्वारी, मका,बाजरी,गवत अशा बियाणांचा समावेश आहे.आतापर्यंत अनेक दूध उत्पादकांनी बियाणांचा लाभ घेतला आहे.एकीकडे दुग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलेला असून शासनाकडून दुधाला योग्य प्रमाणात दर मिळत नाही.कोरोना काळाच्या आधी मिळत असलेला ३० रुपये दर एकदमच २३-२४ रुपयावर आल्याने दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.पशुखाद्याचे दर आवाक्याच्याबाहेर गेल्याने दूध धंदा परवडणारा राहिला नाही.चारा उपलब्ध करुन जनावरे जगविण्यासाठी चारा बियाणांचा चांगला उपयोग होणार आहे.सध्या दुधाचा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत निर्माण झालेली आहे.या शिवाय लॉकडाऊनमुळे हॉटेल्स,दुकाने,शाळा,महाविद्यालये,छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने दूध विक्री सुमारे ७० टक्क्यांनी कमी झाली आहे.शासन १०० टक्के दूध खरेदी करीत नसल्याने दुधाची साठवण करण्याची वेळ आली आहे.अशा परिस्थितीमुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत.त्यांना हातभार लावण्याच्या दृष्टीने संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने मोफत बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.आतापर्यंत अनेक दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशी माहितीही श्री परजणे यांनी दिली आहे.

संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे प्रकल्प समन्वयक डॉ.चंद्रकांत धंदर यांनी चारा बियाणे वाटपाचे योग्य नियोजन केले असून दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही शेवटी त्यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close