जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रेमडेसीविरचा तुटवडा,नातेवाईक हैराण,प्रशासनाचे कानावर हात!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर वाढली असून या साथीचा ताप कमी करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे औषध म्हणून “रेमडेसीविर” औषधांची ओळख असून सध्या याला प्रचंड मागणी वाढली असून सरकारने हा तुटवडा कमी करण्यासाठी निर्यात बंदी केली असली तरी अद्याप याचा पुरवठा सुरळीत झाला नसून कोपरगावात सध्या मोठी टंचाई निर्माण झाली असून याकडे राजकीय नेते व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

“रेमडेसीविर या औषधांची विक्री आता सरकारने आपल्या ताब्यात घेतली असून त्याचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडे सोपवले आहे.कोपरगाव तालुक्यात जे अधिकृत (डी.सी.ए.सी.) उपचार केंद्र आहे.आज आत्मा मालिक हॉस्पिटलला बारा तर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलला चोवीस इंजेक्शन उपलब्ध झाले आहे.आधी कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने निर्मिती कमी होती मात्र आता रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे”-डॉ.संतोष विधाते,तालुका वैद्यकीय अधिकारी,कोपरगाव.

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा विक्रमी वाढ देशात काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात दिवसागणिक अधिकाधिक भर पडत असल्यामुळं आता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे मोठी आव्हानं उभी राहत आहेत.केंद्रीय आरोग्य विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांत देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे.जवळपास दीड लाखांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यामुळं आता कोरोनाची धास्ती आणखी वाढली आहे.कोपरगावात प्रतिदिन हा आकडा दीडशे-दोनशेच्या आसपास रेंगाळताना दिसत आहे.विशेष म्हणजे गत अकरा दिवसात सोळा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे हे धक्कादायक आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्येतही मोठी वाढ झाली आहे.त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगावातील अनेक औषधालये याचा काळा बाजार करून मोठी माया जमा करत असून माणुसकीला काळिमा फासत असताना दिसत आहे.त्याला काही उपाययोजना करणार आहे की नाही असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांनी विचारला आहे.

‘रेमडेसिवीर’औषध आहे तरी काय ?

कोव्हिड-१९ आजार नवीन होता तेव्हा उपचार पद्धती विकसित करताना रेमडेसिवीर,हायड्रोक्सीक्लोरोक्वीन,डेक्झामेथेसॉन अशा अनेक औषधांचा जागतिक पातळीवर विचार झाला.वेगवेगळ्या देशात तिथल्या आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याने या औषधांचा वापरही केला गेला.वेगवेगळ्या वळणांवर काही औषधं उपयुक्त ठरली तर काहींचा फायदा होत नसल्याचंही सिद्ध झालं.यातलंच एक महत्त्वाचं औषध म्हणजे रेमडेसिविर.रेमडेसिवीर हे अँटी व्हायरल (विषाणूवर मात करणारं) औषध आहे.इबोला या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ते विकसित करण्यात आलं कोरोनाच्या सुरुवातीच्या उद्रेकावेळी लक्षणं कमी करण्यात ते प्रभावी ठरत असल्याचा निर्वाळा अमेरिकन संस्थांनी दिला होता.पण, त्याची किंमत एका डोससाठी ११०० ते १४०० रु.इतकी जास्त आहे.पुढे जागतिक आरोग्य संघटनेनं आणि अनेक आरोग्य संस्थांनी विविध देशांत कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर अभ्यास सुरू केला आणि कुठलं औषध गुणकारी आणि परिणामकारक ठरतं यावर संशोधन सुरू झालं.ऑक्टोबर २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं रेमडेसिविरबद्दल एक सविस्तर अहवाल सादर केला.यात ‘कोव्हिड रुग्णांचा जीव वाचवण्याच्या बाबतीत हे औषध खूपच कमी,म्हणजे अगदी नगण्य परिणामकारक’ असल्याचा निर्वाळा दिला होता.उपयोगाच्या मानाने किंमत जास्त असल्याचा ठपकाही ठेवला होता.जगातील ३० देशांमध्ये ५०० च्या वर रुग्णालयांत ११ हजार,२६६ रुग्णांचा अभ्यास करून आरोग्य संघटनेनं आपलं मत मांडलं आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेमडेसिविर फारसं प्रभावी ठरत नसल्याचं त्यांचं मुख्य निरीक्षण होतं.शिवाय रुग्णालयातलं वास्तव्य कमी करण्यातही औषधाला फारसं यश मिळालं नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.भारतात हे औषध कधी वापरायचं याबद्दल आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्व घालून देण्यात आली आहेत.गंभीर रुग्णाचा ताप कमी होत नसेल तर हे औषध वापरण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे.जालना इथं एका पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी, ‘रेमडेसिविरचा परिणामकारक, प्रभावी वापर ही राज्यसरकारची पुढच्या पंधरा दिवसांतील प्राथमिकता आहे.रेमडेसिविरचा साठा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत करण्यात येईल आणि खाजगी रुग्णालयांना गरज पाहूनच साठा वितरित करण्यात येईल.गरज नसताना या औषधाचा वापर झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत,’ असं बोलून दाखवलं आहे.आता असं असताना रेमडेसेविरचा वापर का होतोय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. त्यासाठी काही वाहिन्यांनी संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी यांच्याशी संपर्क साधला.कोरोनावर अजून कुठलंही औषध नाही.त्यामुळे रेमडेसिविर हे कोरोनावरचं औषध नाही, हे डॉ. गिलडा यांनीही मान्य केलं.’जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,रेमडेसिविरचा अतिवापर टाळला पाहिजे.पण,भारतात रुग्णाला सौम्य,नियमित किंवा गंभीर कुठलीही लक्षणं आढळली तरी रेमडिसिविरचा उपयोग केला जात आहे.त्यामुळे अगदी गंभीर आजार असलेल्या रुग्णांना जेव्हा गरज लागते तेव्हा औषध उपलब्ध होत नाही.फक्त विशिष्ट प्रकारच्या गंभीर आजारी असलेल्या रुग्णासाठीच रेमडेसिविरचा वापर झाला पाहिजे,’ डॉ.गिलडा यांनी सांगितलं आहे.या औषधांचा काळा बाजार सुरु झाल्याने इथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयातून या औषधाचा साठा सरकारी रुग्णालयांसाठी गरजेनुसार, वितरित होईल. यामुळे औषधाचा गैरवापर आणि काळा बाजार दोन्हीवर नियंत्रण बसवण्याचा सरकारचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close