जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनावाढ आटोक्यात येईना!

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यात सलग आठव्या दिवशी देशात हजारोहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही कोपरंगाव तालुक्यात नगरहुन तपासून आलेल्या अहवालात ०० तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात २२ तर रॅपिड टेस्ट मधून ०८असे एकूण ३० रुग्ण बाधित आढळल्याने आकडा खाली आला असला तरी कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.जात असून १४ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा टाळेबंदीकडे वाटचाल तर करीत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ३७३ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या २३६ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.४५ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ०९६ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८८ हजार ३८४ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १५.२७ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०८८ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९१.५५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७९ हजार ८८० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०२ हजार ३२८ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७६ हजार ३८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १७१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-३० बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-१३ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.कोपरगाव पुरुष वय-२४,३४,८८,महिला वय-२०, इंदिरा पथ पुरुष वय-३४,साबळे वस्ती पुरुष वय-४१,राम मंदिर रोड पुरुष वय-२६,सराफ बाजार वय-१९,६०,सह्याद्री कॉलनी पुरुष वय-२१,वडांगळे वस्ती वय-३६,बालाजी प्लाझा -पुरुष वय-६३,जानकी विश्व पुरुष वय-६३,आदींचा समावेश आहे.

तर तालुका हद्दीतील १७ रुग्ण पुढील प्रमाणे कान्हेगाव महिला वय-२३,रवंदे तीन पुरुष वय-३१,४८,२२,कुंभारी पुरुष वय-६०, तर शिंगणापूर पुरुष वय-३५,२५,ब्राम्हणगाव पुरुष वय-६९,रांजणगाव देशमुख वय-५३,मुर्शतपुर पुरुष वय-४५,कोळपेवाडी येथील एक पुरुष वय-५८,सांगवी भुसार पुरुष वय-६८,महिला वय-६४,चांदेकसारे पुरुष वय-३३,खोपडी एक पुरुष वय-७६,कोकमठाण महिला वय-६५,पोहेगाव महिला वय-७० आदींचा समावेश आहे.

दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close