दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील अनेक रस्ते प्रगतीपथावर-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधी हा जनता व सरकारमधील दुवा असतो.त्या माध्यमातून जनतेच्या सेवकाची भूमिका पार पाडतांना मतदार संघातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम मिळत असून मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या वारी ते कान्हेगाव रस्त्याचे व आ. काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कान्हेगाव चौकी ते सात आंबेगाव वस्ती रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत २१.७३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या वारी ते कान्हेगाव रस्त्याचे व आ. काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कान्हेगाव चौकी ते सात आंबेगाव वस्ती रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन आणि जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत ८.५० लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या आंगणवाडी इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,जिनिंग व प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,विजय गायकवाड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव,माजी सरपंच रावसाहेब टेके,सुमित टेके,संजय जाधव,प्रतीक होवाळे,लक्ष्मण चौधरी,बनकटराव जगताप,देवचंद कडेकर,दिनकर काजळे,बबन सांगळे,जनार्दन जगताप,अनिल काजळे,दीपक भाकरे,सचिन मेहेरे,नामदेव जाधव,दत्तात्रय शिरसाठ,भास्कर आदमाने,वाल्मिक जाधव,नवनाथ जाधव,बाबासाहेब शिंदे,राजेंद्र पांडे,नानासाहेब टेके,रमेश कोकाटे,प्रवीण खैरनार,पंडित चव्हाण,राजेंद्र गायकवाड आदींसह वारी व कान्हेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके म्हणाले की.”कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावात रस्त्यांची अवस्था पाहता या गावात रस्ते आहेत का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींची दखल घेवून कान्हेगाव-वारी परिसरातील रस्त्यांसाठी आ.काळे यांनी निधी देवून या रस्त्यांचे प्रश्न कोरोनाच्या संकटात देखील मार्गी लावले.जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे आ. काळे आदर्श उदाहरण असून त्यांच्या रूपाने तालुक्याला काम करणारा लोकप्रतिनिधी लाभला आहे”.यावेळी कान्हेगाव-वारी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.