आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढीला आळा नाही
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०४ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी ३३ स्राव पाठवले आहे.तेथून तपासणीत ०० रुग्ण बाधित आला आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून ०२ रुग्ण बाधित आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ०६ झाली आहे.तर आधी भरती असलेल्या ०८ उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६९ हजार ०३३ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १०४४ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात शहर व ग्रामीण भागात अधिकची रुग्ण वाढ थांबली असली तरी रुग्ण वाढ सुरु आहे.
दरम्यान कोपरगाव शहरात आज ०५ रुग्ण बाधीत आढळले आहे.त्यात निवारा पुरुष वय-५८,३०,एक महिला वय-५७,शिवाजी रोड एक पुरुष वय-४५,कोर्टरोड एक पुरुष वय-५६ आदींचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागात तालुक्यात आज ०१ रुग्ण बाधित आढळले आहे.त्यात धामोरी एक महीला वय-६० आदींचा समावेश आहे.तर त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ७११ इतकी झाली आहे.त्यात ६३ रुग्ण सक्रिय आहेत.त्यामुळे आज पर्यंत ४३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.५८ टक्के आहे.आतापर्यंत १९ हजार ०४१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७५ हजार ८९२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.२३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ६०५ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९६.०९ टक्के झाला आहे.दरम्यान काल शहरी भागात आज रुग्ण वाढ थांबली असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.