जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ज्यांच्यामुळे वेगळी ओळख निर्माण झाली त्यांनाच विसरले-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

ज्या काळे कुटुंबाने मोठं केलं,त्यांच्या संस्थांवर अनेक वर्ष पदाधिकारी म्हणून मानसन्मान मिळाला.ज्यांच्यामुळे आपली वेगळी ओळख निर्माण झाली त्या काळे कुटुंबाचे उपकार विजय आढाव खूप लवकर विसरले याचे आश्चर्य वाटत असल्याची टीका कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष चवंडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“तालुक्यात रेशन दुकानदार सगळ्यात जास्त कोल्हे गटाचे आहेत.रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष देखील कोल्हे गटाचा आहे याची माहिती आढाव यांनी एकदा घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर त्यांना समजेल की आपण निषेध कोणाचा केला पाहिजे.त्याचबरोबर आपणास आपण आज कुणामुळे उभे आहोत,कोपरगावच्या पटलावर आपले नाव कुणामुळे आले व आपली ओळख कोणामुळे निर्माण झाली आहे”-संतोष चवंडके,माजी नगरसेवक.

कोपरगाव नगरपरिषेच्या निवडणूक जशी जवळजवळ येत आहे तसा तसा राजकीय ताप वाढण्यास सुरुवात झाली आहे.भाजपचे युवराज यांनी नगरपरिषदेवर आपल्या समर्थकांचा मोर्चा नेऊन त्यास प्रारंभ केला आहे.त्यात त्यांनी आरोप प्रत्यारोपास सुरुवात केली आहे.त्यास चवंडके यांनी उत्तर दिले आहे.त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”एका आंदोलनास झीलकरी कार्यकर्ता म्हणून उपस्थित असलेल्या विजय आढाव यांनी नेत्याला खूष करण्यासाठी रेशनच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींचा निषेध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून नेत्याची वाहवा मिळवली.याचा कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष चवंडके यांनी समाचार घेतांना त्यांनी रेशन दुकानदार सगळ्यात जास्त कोल्हे गटाचे असल्याचे वास्तव दाखवून दिले आहे.रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष देखील कोल्हे गटाचा आहे याची माहिती आढाव यांनी एकदा घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर त्यांना समजेल की आपण निषेध कोणाचा केला पाहिजे.त्याचबरोबर आपणास आपण आज कुणामुळे उभे आहोत,कोपरगावच्या पटलावर आपले नाव कुणामुळे आले व आपली ओळख कोणामुळे निर्माण झाली तत्पूर्वी आपली ओळख काय होती याची देखील जाणीव असणे तेवढेच गरजेचे आहे.

असं म्हणतात माणसाने कृतज्ञ असावं,परंतु कृतघ्न नसावं मात्र विजय आढाव यांना याचा विसर पडलेला दिसत आहे.ज्यांचा तुम्ही निषेध करीत आहात त्यामध्ये निषेध करण्यासारखे काहीच नाही.याउलट जीवघेण्या कोरोना संकटाच्या काळात अंत्योदय योजनेतील कुटुंबांची उपासमार होणार नाही याची काळजी घेवून त्यांनी या कुटुंबांना मोफत रेशन उपलब्ध व्हावे यासाठी महात्मा गांधी चारीटेबल ट्रस्ट व श्री साईबाबा तपोभूमी यांच्या वतीने आर्थिक मदत केली.त्यावेळी कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये काळया बाजारात विक्रीसाठी चाललेला रेशनचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला होता ते कोणाचे कार्यकर्ते होते,मागील पाच वर्षात गरिबांच्या ताटातील घास कोणी गिळंकृत केले,रेशन माफिया कोणी तयार केले याचा शोध घेतल्यास विजय आढाव यांना निषेध कुणाचा करायचा याची नक्की उपरती होईल असा टोला चवंडके यांनी शेवटी लगावला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close