जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नवीन गाळ्यासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर हद्दीत समता नगर येथील रहिवासी असलेल्या महिलेला आपल्या माहेराहून नवीन गाळ्यांचे पैसे भरण्यासाठी ०२ लाख रुपये आणावे यासाठी आरोपी नवरा सागर छत्रु लिंभुरे,सासरा छत्रु गंगाधर लिंभुरे,आदींनी शारिरीक मानसिक,छळ करून आपल्याला मारहाण,शिवीगाळ,दमदाटी करून घराबाहेर हाकलून दिले असल्याची फिर्याद नीलम सागर लिंभुरे (वय-३३) ह.मु.महादेव नगर हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिलेचे लग्न झाल्यावर सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या अंडळींनी आपले रंगढंग दाखविण्यास सुरुवात केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.त्या नंतर आरोपी नवरा सागर लिंभुरे व सासरा छत्रु लिंभुरे यांनी त्रास द्यायला सुरुवात केली.ती गत ३१ मार्च रोजी पर्यंत त्यांनी फिर्यादी महिलेला शारीरिक,मानसिक त्रास देऊन तिला तिने तिच्या माहेराहून नवीन गाळा घेण्यासाठी ०२ लाख रुपये आणावे यासाठी मारहाण,शिवीगाळ,दमदाटी करून तिला घराबाहेर हाकलून दिले असल्याचे आपल्या फिर्यादीत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिलेचे दि.१७ जून २००८ रोजी सागर लिंभुरे यांचेशी मोठे वाजत गाजत फिर्यादी महिलेच्या माहेरच्या मंडळींनी लग्न लावून दिले होते.लग्न झाल्यावर सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या अंडळींनी आपले रंगढंग दाखविण्यास सुरुवात केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.त्या नंतर आरोपी नवरा सागर लिंभुरे व सासरा छत्रु लिंभुरे यांनी त्रास द्यायला सुरुवात केली.ती गत ३१ मार्च २०२२ रोजी पर्यंत त्यांनी फिर्यादी महिलेला शारीरिक,मानसिक त्रास देऊन तिला तिने तिच्या माहेराहून नवीन गाळा घेण्यासाठी ०२ लाख रुपये आणावे यासाठी मारहाण,शिवीगाळ,दमदाटी करून तिला घराबाहेर हाकलून दिले असल्याचे आपल्या फिर्यादीत आहे.तिने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.याआधी महिला साहाय्य कक्ष येथे समुपदेशन करण्यात आले मात्र उपयोग झाल्याचे दिसून आले नाही.अखेर हा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५६/२०२२ भा.द.वि.कलम ४९८,(अ)३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close