जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव बसस्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी व्यापारी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे कोपरगाव शहरातील विस्थापितांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

कोपरगाव शहरात मार्च २०१० रोजी अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली होती.त्या नंतर प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांनी विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र निवडणूक संपन्न झाली व मतपेट्या बंद झाल्या की विस्थापितांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पातक केले होते. त्या नंतर पुढील निवडणुकीत हा विषय उपस्थित होत असे मात्र वर्तमान काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कोपरगाव दौऱ्यात या बाबत आश्वासन दिले होते त्या नुसार नुकतीच मंत्रालय पातळीवर मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेतल्याने अनेक विस्थापितांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मागील आठवड्यात कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी आ.काळें यांनी कोपरगाव शहरातील राज्य परिवहन विभागाच्या बस आगारात विस्थापितांसाठी कोपरगाव बस आगाराचे बाजूने व्यापारी संकुल उभारण्याची मागणी केली होती.त्या पार्श्वभूमीवर मंत्रालायत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी हे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.

सदर प्रसंगी बैठकीसाठी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे,आ.आशुतोष काळे,वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक,परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग,नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन गद्रे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे,परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने,अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले,लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत बसस्थानक परिसरात असलेल्या रिकाम्या जागेत बसतील एवढे व्यापारी संकुल उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आ.आशुतोष काळें यांनी दिली आहे. त्यामुळे कोपरगाव बसस्थानक परिसर लवकरच विकसित होणार आहे.त्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,परिवहनमंत्री ना.अनिल परब व परिवहन राज्यमंत्री ना.सतेज पाटील,पर्यावरण राज्यमंत्री ना.संजय बनसोडे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close