कोपरगाव तालुका
चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी महावीरांचे विचार उपयोगी-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भगवान महावीर यांनी नेहमी समाजाला प्रेम,अहिंसेचा मार्ग दाखवला असून आज चिंतामुक्त जीवन जगायचे झाल्यास महावीरांचे बहुमोल विचार उपयोगी पडणार आहेत.असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता.सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार) चे वासोकुंड मानले जाते. २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथजी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी त्यांचा जन्म झाला असे मानले जाते.जैन ग्रंथानुसार,जन्मानंतर,देवांचे मस्तक,इंद्राने मुलाला सुमेरू पर्वतावर नेले आणि मुलाला क्षीरसागराच्या पाण्याने अभिषेक केला.शहरात आले.वीर आणि श्रीवर्गमान यांनी ही दोन नावे ठेवली आणि उत्सव साजरा केला.याला जन्म कल्याणक म्हणतात.प्रत्येक तीर्थंकराच्या जीवनात पंचकल्याणक उत्सव साजरा केला जातो.त्यांची जयंती आजही भाविक भक्तमोठ्या उत्साहात साजरी करतात.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने कोपरगाव येथे काढण्यात आलेल्या रथ यात्रेत आ.काळे सहभागी झाले होते.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघपती प्रेमचंदजी भंडारी,प्रविण गंगवाल,विजय पहाडे,संजय बंब,प्रविण दोशी,सुनील बेदमुथा,महावीर दगडे,अशोक पापडीवाल,डॉ.अमोल अजमेरे,दिपक अजमेरे,अमित लोहाडे, अनिलजी काले,कैलास ठोळे,डॉ.दगडे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,माजी नगरसेवक मंदार पहाडे,तुषार बागरेचा अजय शहा,भंडारी,सचिन ठोळे,सुरेंद्र ठोळे,आनंद दगडे,सी.डी.ठोळे,राजेंद्र गंगवाल,पियुष गंगवाल,आनंद पहाडे,आनंद काले,संतोष गंगवाल,प्रियाताई अजमेरे,आरती गंगवाल,प्रेमाताई बज,सोनल अजमेरे आदींसह ट्रस्टी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.