कोपरगाव तालुका
प्रत्येक घरामधून समतेचे बीजरोपण व्हावे-आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय संविधानातील मार्गदर्शन तत्वांच्या आधारे सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असला तरी घरातील संस्कार कमी पडत असल्याचे सार्वजनिक चित्र दिसत असून प्रत्येक घरातील वाईट संस्कारच मुला-मुलींना पोषक असल्याने त्याचे दुष्परिणाम वाढले असल्याचे दिसतआहे. घरां-घरातून समतेचे बीजरोपण करावे परिणामी महिलांवर अत्याचार होणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड् रंजना गवांदे यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे म्हणाले कि,युवक युवतींना नेहमी अंधश्रद्धेची होळी करण्याचे व समानतेचे महत्त्व समजून घेणे महत्वाचे आहे. महिला दिनाचे निमित्ताने महाविद्यालयातील मुलींनी अनिष्ट रुढी, परंपरा, अस्पृश्तता,एकतर्फी प्रेमाचे दुष्परिणाम आदी विषयावर त्यांनी भाष्य केले आहे.
कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथि म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. आर. थोपटे हे होते.
कार्यक्रमास माजी अशोक गवांदे,श्रीमती थोपटे,प्रा.व्ही.बी.गायकवाड,डॉ.बाबासहेब शेंडगे,डॉ.राजाराम कानडे,डॉ.देविदास रणधीर,प्रा.चंद्रकांत चौधरी,डॉ.सुरेश काळे,प्रा.दुबे,प्रा.सावकार हाडोळे,प्रा.बाबासाहेब वाघ,प्रा.सुशीला ठाणगे,प्रा.छाया शिंदे,प्रा.चित्रा करडे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांना शिक्षणाची ऊब देण्याचे कार्य स्त्री व अस्पृश्य उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या आदर्श दाम्पत्याने केले असून सावित्रीने अनौपचारिक शिक्षणातून व पारिवारिक संस्कारातून समाज सुधाराचे काम केले म्हणजेच घरातील समानतेचे संस्कार फार मोलाचे असल्याचे शेवटी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.डॉ.गणेश विधाटे यांनी केले व सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सावंत यांनी केले तर आभार प्रा.डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य रमेश झरेकर, अधीक्षक श्री वसंत पवार, प्रा.रामदास मुंगसे इ.शिक्षक-शिक्षकेत्तर सेवकांचे सहकार्य लाभले.