जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैध वाळूचोरी,तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबन्ध असतानाही वारी ग्रामपंचायत हद्दीत अवैध वाळूचोरी सुरु असल्याची गुप्त खबर नगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसाची मदत घेऊन छापा टाकला असता त्यांना त्यात तथ्य आढळले असुन त्यानी तेथील अशोक लेलंड कंपनीच्या टेम्पो वाळूचोरी करताना पकडला आहे.व आरोपी संतोष बाबुराव आदमाणे (वय-४०) रा. विहितगाव नाशिक ह.मु.शिंगवे ता.राहाता व टेम्पो मालक विलास गाढवे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून टेम्पोसह ५ लाख दहा हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी पो.कॉ.कमलेश हरिदास पाथरुट स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीनुसार संतोष आदमाणे व टेम्पो चालक(टेम्पो क्रमांक एम.एच. १५ जी. व्ही.६६९०) विलास गाढवे या दोन्ही आरोपी विरुद्ध भा,द.वि.कलम ३७९,३४ सह पर्यावरण कायदा कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close