जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आदिवासीस घरातून हाकलले,कोपरगाव गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा हद्दीतील आदिवासी इसम यास ग्रामपंचायतीने दिलेल्या घरकुलात रहात असताना त्यांना तेथील ग्रामपंचायत सदस्य किशोर भाबड यांनी हाणमार करून त्या घरातून काढून दिले असल्याची तक्रार मोतीराम फकिरा मोरे यांनीं कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे.

“आपण घटनास्थळी भेट दिली असून या आरोपात तथ्यांश आढळला आहे.सदर ठिकाणी अन्य इसम रहात असून जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांचे अपात्रतेचे प्रकरण जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी सुरु आहे.त्यावर आपण तसा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे त्यावर कार्यवाही सुरु आहे”-सचिन सूर्यवंशी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.

त्यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आपण मौजे जेऊर पाटोदा येथील रहिवासी असून आपल्याला घरकुल योजनेचे घरकुल मिळालेले आहे.आपण त्यात वास्तव्यास असताना तेथिल इसम किशोर भाबड व त्यांची पत्नी यांनी मारहाण करून घरांमधून काढून दिले आहे व आपल्या घरावर अनधिकृत ताबा मिळवला आहे.
आपण आदिवासी असल्याने भीतीपोटी परागंदा झालो आहे.घर असूनही बेघर झालो आहे.रानावनात काम करून आपली उपजीविका चालवत असून माझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे.गटविकास अधिअकारी व पोलीस अधिकारी यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.निवेदनावर कोपरगाव पंचायत समितीस व कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिल्याच्या पोहच आमच्या प्रतिनिधीस दिल्या आहेत.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण घटनास्थळी भेट दिली असून त्यात तथ्यांश आढळला आहे.सदर ठिकाणी अन्य इसम रहात असून या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांचे अपात्रतेचे प्रकरण जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी सुरु आहे.त्यावर आपण तसा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close