कोपरगाव तालुका
मनमाड मधील महिलेवर अत्याचार,कोपरगावात गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवाशी असलेल्या मात्र सासर मनमाड येथील असलेल्या २६ वर्षीय विवाहित महिलेवर आंबेडकर चौक मनमाड येथील आरोपी मनोज गणेश पवार याने २२ फेब्रुवारी पासून ते २८ फेब्रुवारी पर्यंत विविध ठिकाणी विविध लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी तालुका पोलिसानी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या महिलेचे लग्न मनमाड येथील तरुणाशी लावून दिले होते.त्यांना अद्याप मुलबाळ नव्हते.दरम्यान आरोपी मनोज पवार याने या महिलेचे तिच्या सासर वरून अपहरण करून तिला २२ फेब्रुवारी पासून अपहरण करून या महिलेला सुरेगाव,शिर्डी, अहमदनगर येथील गुजराथी लॉज व आळे फाटा येथे नेऊन शारीरिक अत्याचार केला असल्याची फिर्याद या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.५९/२०२० भा.द.वि.कलम ३७६,(२)(एन),३६३ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.