कोपरगाव तालुका
कोपरगावात माजी सैनिकांच्या कार्यालयाचे उदघाटन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्यातील शहिद जवान अमोल जाधव यांच्या पत्नी श्रीमती सरला जाधव व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा,समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
“देशातील सर्वच सैनिकांसाठी ठेवींवर आकर्षक वाढीव व्याजदर उद्यापासून सर्वच शाखांमध्ये देण्यात येणार आहे.राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सैनिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मर्यादित स्वरूपात मोफत करण्यात येईल”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष समता सहकारी पतसंस्था कोपरगाव.
कोपरगाव येथील एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनच्या कार्यालयास जागा नव्हती याची दखल घेत समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतीच जागा उपलब्ध करून दिली आहे.त्याचे उद्घाटन कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन्स असोसिएशनचे अध्यक्ष युवराज गांगवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता परिवाराचे संस्थापक,मार्गदर्शक ओमप्रकाश कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक अरविंद पटेल,गुलशन होडे,महाव्यवस्थापक सचिन भट्टड,मुख्य कार्यालयाचे अधिकारी,एक्स सर्व्हिसमेन्सचे सदस्य,कोयटे विद्यालयाच्या कार्यवाह सुहासिनी कोयटे,साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र व्यास,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार,प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक जनार्दन कदम,वैभव गिरमे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समता मुख्य कार्यालयाचे संजय पारखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भालचंद्र विभुते यांनी मानले आहे.