जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात तरुणांची आत्महत्या,अकस्मात मुत्युची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उत्तरेस साधारण दोन कि.मी.अंतरावर असलेल्या साईसीटी या उपनगरात रहिवाशी असलेला तरुण मोसीन अब्दुल मोंमीन (वय-३८) मूळ रा.विंचुर ता.निफाड याने आपल्या राहत्या घरात छतांचे पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मयताचा मोठा भाऊ इद्रीस अब्दुल खालिद मोमीन (वय-४०) रा.सदर यांनी खबर दिली आहे.

आत्महत्या करणारे तरुण रागीट,व्यसनाधीन,आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते.याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते.ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात,ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.मात्र कोपरगावात घडलेली आत्महत्या नेमकी कशामुळे घडली हे अद्याप निश्चित झालेले नाही.

आता १५ ते ३५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे ही चिंतेची बाब आहे.या वयोगटात अभ्यासाचा ताण,परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत.आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.सामाजिकदृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात.रागीट,व्यसनाधीन,आततायी,हट्टी,टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते.मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते.याचे सर्वात जास्त प्रमाण नैराश्यात असते.ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात,ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.
काही वेळेला मनासारखे करून घेण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली जाते.त्याबद्दल काही केले नाही तर क्रमाने ही सवय वाढून आत्महत्येचा प्रयत्नही केला जातो.मात्र कोपरगावात नुकतीच घडलेली आत्महत्या नेमकी कुठल्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र आत्महत्या झाली हे नक्की झाले असून या प्रकरणी मयताच्या वडील भावानेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीस मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत इसम हा व्यसनाधीन होता.व तो आपल्या चास नळी येथील शिक्षक असलेल्या भावाकडे भेटण्यास म्हणून कोपरगावी आईला घेऊन आला होता.त्याने या पूर्वीही असाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.तो विवाहित असून त्याच्या व्यसनापायी त्याची पत्नी त्याला कंटाळून सोडून गेलेली आहे.त्याला मुलबाळ काहीही नाही.हि घटना गुरुवार दि.२७ जानेवारी रोजी सायंकाळी ०४.४५ पूर्वी हि घटना उघडकीस आली आहे.प्रथम आईने तो आवाज देऊनही का प्रतिसाद देत नाही.म्हणून खिडकीतून पाहिले असता तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला असता आईने हंबरडा फोडला होता.तेंव्हा इतर नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास दरवाजा तोडून बाहेर काढले.व उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास तपासणी करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी खबर देणार इसम इद्रीस मोमीन यांचे खबरी नुसार आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद दप्तर क्रं.०८ /२०२२ सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close