कोपरगाव तालुका
चासनळीत कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला निरोप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील कोपरगाव तालुका एजुकेशन सोसायटीच्या के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नुकताच निरोप समारंभ संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
राज्यातील उच्च माध्यमिक परिक्षांचा कालखंड जवळ येत चालला आहे.बारावीचे वर्ष हे या विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे मानले जाते.त्यामुळे या परीक्षांचे ओझे हे विद्यार्थी आपल्या डोक्यावर मिरवताना दिसतात त्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी कसा ताणतणाव विरहित अभ्यास करून परीक्षांना सामोरे जावे आहे आपल्या, “मन कि बात” या कार्यक्रमातून सांगितले आहे.या ताण तणाव विरहित परीक्षांचा सामना करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चास नळी येथील कनिष्ठ महाविद्यल्याने नुकताच या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
त्यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, जगन्नाथ उबाळे,रामभाऊ गाडे,महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी.बारे, सुजित रोहमारे,आदींसह बहुसंख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी अशोक रोहमारे मार्गदर्शन करताना म्हणाले कि,कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थी आगामी कालखंडात कायम पुढे असावा यासाठी संस्था कायम प्रयत्नशील आहे.त्यासाठी बी.सी.ए. व बी.सी.एस. आदी कोर्सेसची सुविधा करून देण्यात आली आहे.या शिक्षणाने तरुणांना चांगल्या शिक्षणाच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी संदीप रोहमारे, रामभाऊ उबाळे,रामभाऊ गाडे,पंडितराव चांदगुडे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी.बारे यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा.एस.बी.पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.एस.एम.उंडे यांनी मानले.