जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण-कौतूक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता महिला बचत गटामार्फत सहकार उद्योग मंदिराचे उद्घाटन केले असून शहरातील व ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सबलीकरण आणि सक्षमीकरण केले जात असून हि गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी २०२१ च्या स्पर्धेतील महाविजेत्या दीपाली आचार्य यांनी केले आहे.

“समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही बाल वयातच विद्यार्थ्यांचे उपजत गुण विकसित होण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करून मोलाचे मार्गदर्शन समताच्या विद्यार्थ्यांना केले जाते.त्यामुळे समताचे विद्यार्थी नोकरी,व्यवसाय करता करता माझ्याप्रमाणे कला गुणांच्या आधारे विविध स्पर्धा मधून समताचे नाव सातासमुद्रापार घेऊन जातील”-दीपाली आचार्य,सौन्दर्य सम्राज्ञी.

पुणे येथे अहिराणी कस्तुरी साहित्य व सांस्कृतिक कला क्रीडा मंचच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा २०२१ मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करत दीपाली आचार्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाविजेत्या ठरल्या.त्या निमित्ताने समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये डॉ.दीपाली आचार्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेत्या असलेल्या त्यांच्या सासू सुषमा आचार्य यांचा सत्कार समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते गौरवचिन्ह,शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,हितचिंतक, नातेवाईक उपस्थित होते.

दरम्यान पोहणे या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक विजेत्या सुषमा आचारी म्हणाल्या की,माझी स्नुषा म्हणून मला दीपालीचा सार्थ अभिमान आहे कारण ग्रामीण भागातील एक स्त्री वैद्यकीय शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रात नावलौकिक मिळवत सांसारिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत स्वतःमधील गुण विकसित करत आज महाराष्ट्रात सौंदर्य सम्राज्ञी म्हणून स्वतःच्या नावाबरोबरच कोपरगाव तालुक्याचेही नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

समताचे अध्यक्ष कोयटे यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ आणि गुच्छ देऊन करण्यात आला आहे.तर उपस्थितांचे स्वागत विश्वस्त स्वाती कोयटे यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार शिक्षिका शिल्पा वर्मा यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close