जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कोपरगाव तालुक्यातील शेततळ्याचे अनुदान लवकरच-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदानाबाबत गत आठवड्यात कृषिमंत्री ना.दादा भुसे यांची भेट घेऊन रखडलेले अनुदानाची मागणी केली होती त्याला प्रतिसाद मिळाला असून या योजनेसाठी ५२.५० कोटी निधी राज्यासाठी मंजूर केला आहे.या निधीतून कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित अनुदान लवकरच मिळणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता. बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळालेले होते. मात्र २०१९-२० या वर्षातील ६९ लाभार्थी शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित होते.त्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे”-आ.आशुतोष काळे.


शासनाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविली जात असून अनेक शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होत असतात. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता. बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळालेले होते. मात्र २०१९-२० या वर्षातील ६९ लाभार्थी शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित होते. या शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी राज्याचे कृषीमंत्री ना.दादा भुसे यांची भेट देखील घेवून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून रखडलेले अनुदान तातडीने मिळावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली होती. त्या मागणीची कृषी विभागाने दखल घेवून सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी संपूर्ण राज्याला ५२.५० कोटी निधी मंजूर केला आहे. या निधीतून २०१७, २०१८, २०१९ व २०२०-२१ मध्ये पूर्ण झालेल्या शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील ६९ लाभार्थी शेतकऱ्यांचे जवळपास ३३ लाख ७६ हजार एवढी बाकी असलेली रक्कम मिळणार असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.

शेततळ्याच्या अनुदानाचा प्रश्न सरकारने सोडविल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार,कृषी मंत्री ना.दादाजी भुसे यांचे आ.काळे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close