जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ट्रकची बसला धडक,सुदैवाने जीवितहानी नाही

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत भास्कर वस्तीजवळ नगर-मनमाड मार्गावर येवल्याकडून कोपरगावकडे येणाऱ्या ट्रकने (क्रं. टी. एन.36ए. पी.1599) बसला (क्रं.एम.एच.40 एन.8803) मागच्या बाजूने दिलेल्या धडकेत राज्य परिवहन मंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी ट्रक चालक अन्बलगन ए. रा.मिटुकडू देवनागोन ता.संगगिरी जि. सेलम याने बस चालक ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील रा.येवला जि. नाशिक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,ट्रकचालक अन्बलगन ए. हे आपल्या आज सकाळी सातच्या सुमारास ताब्यातील ट्रक घेऊन येवल्याकडून कोपरगावकडे येत असताना पाठीमागून येवल्याकडून कोपरगावकडे येणारी बस बसचालकाने वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून बसचे नुकसान केले असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु.र.नं.4/2020 भा.द.वि.कलम 279,427 ,मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close