जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भारतीय नागरिक असणे हाच सर्वात मोठा सन्मान-सुशांत घोडके

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

प्रत्येकाला आयुष्यात आपापल्या कर्तृत्वानुसार वेगवेगळे सन्मान मिळत असतात परंतू विविधतेने नटलेल्या आणि परंपरांचा पाईक असलेल्या भारत देशाचा नागरिक असणे हाच सर्वात मोठा सन्मान असल्याचे प्रतिपादन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

सलग तीन दिवस विविध ऑलिंपिक खेळा बरोबर धावणे आणि कबड्डी या भारतीय विशेष खेळांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सहभागी होत स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील विश्वभारती ग्रामीण शिक्षण संस्थेच्या रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विविध शालेय अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि पारितोषिक वितरण समारंभचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष लहानुभाऊ नागरे हे होते.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कांतीलाल अग्रवाल, विश्वस्त संजय नागरे,मनोज अग्रवाल,आनंद दगडे नितीन शिंदे, जयद्रथ जोशी, दिनार कुदळे यांच्यासह विविध मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,विद्यार्थी आणि पालकांनी जीवनशैली जोपासतांना स्पर्धेच्या मृगजळापासून सावध व्हावे.रेनबो इंटरनँशनलच्या विद्यार्थ्यांना भारताचे सभ्य नागरिक म्हणून उज्वल भवितव्य असल्याचे सांगत प्रबोधनाची गोष्ट सांगितली. कार्यक्रमास राष्ट्रीय बेसबॉल पटू अक्षय आव्हाड हे उपस्थित होते.

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी ‘चक दे इंडिया’ गीतावर खेळाचे साहित्य सोबत घेत समूहनृत्य सादरीकरण केले.

सलग तीन दिवस शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य मोसिन शेख यांनी तर सूत्रसंचलन प्रा.कैलास ढमाले, प्रा.प्रशांत भास्कर, प्रा.सचिन पवार यांनी केले. तर आभार उपप्राचार्य सोमनाथ सोनवणे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close