कोपरगाव तालुका
क्रांतिकारक भांगरे,मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आद्य क्रांती कारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती कोपरगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले. अनेकांच्या छोट्या मोठ्या लढाया यावेळी महत्त्वाच्या होत्या. इतिहासाने त्याची दखल घेतली असली तरी अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली गेली नाही. ते समाजापर्यंत पोहोचलेच नाही.आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरे,वीर भगवान बिरसा मुंडा यांची दखल इतिहासाला घ्यावी लागली.परंतु अजूनही ते जनसमाजात पोहोचलेले नाहीत.
दि.०८ नोव्हेंबर २०२० सोमवार सकाळी १० वाजता कोपरगाव तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम समाज बांधवांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे.
यावेळी सर्व समाज बांधवांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे.यावेळी आदिवासी महादेव कोळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे,ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय वायखिंडे,बाळासाहेब लवांडे,सुरेश कांगुणे,मनोहर शिंदे,भरत आगलावे,चंद्रकांत शेजुळ,नंदु लांडगे,आदी समाज बांधव उपस्थित होते.