जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अंगणवाडीत चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत असललेल्या एकात्मक बालविकास योजनेच्या अंगणवाडीत कोणातरी अज्ञातच चोरट्याने अंगणवाडीचा दरवाजा तोडून गॅस टाकी व गॅस शेगडी चोरून नेली असल्याची फिर्याद अंगणवाडी सेविका जयश्री भानुदास सोळसे (वय-४०) रा.संवत्सर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांत खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला सोळसे या करंजी येथील अंगणवाडी दि.०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८ वाजता त्या नियमितपणे गेल्या असता त्यांना अंगणवाडीस असलेला दरवाजा तोडलेला आढळला असून आत स्वयंपाकासाठी असलेल्या सुमारे ०२ हजार रुपये किमतीची गॅसची टाकी व गॅस शेगडी चोरून नेलेली आढळली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला जयश्री सोळसे या संवत्सर येथील रहिवासी असून त्या करंजी येथील एकात्मिक बालविकास योजनेच्या करंजी येथील येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत.दि.३० ऑक्टोबर दिपावलीची सुटी लागल्याने त्यांनी आपली अंगणवाडी बंद करून घेतली होती.व त्या नंतर सदरची अंगणवाडी दि.०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८ वाजता त्या नियमितपणे गेल्या असता त्यांना अंगणवाडीस असलेला दरवाजा तोडलेला आढळला असून आत स्वयंपाकासाठी असलेल्या सुमारे ०२ हजार रुपये किमतीची गॅसची टाकी व गॅस शेगडी चोरून नेलेली आढळली आहे.
त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८२/२०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.आर.वाखुरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close