जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोवंश हत्या प्रतिबंध,कोपरगावात महिलांसह वकिलांनी केला विरोध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गोवंश हत्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.आता तर हा व्यवसाय थेट घरातून चालवला जात असून याचे बंद पाकिटातील मांस ग्राहकांच्या घरी पोहचवले जात असल्याच्या खात्रीशीर बातम्या हाती आल्या असून या विरोधात आता योग्य प्रचार समितीच्या महिला आघाडी रणांगणात उतरली यात थेट नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या धर्म पत्नी उमा वहाडणे यांच्यासह वकील संघानेही उडी घेतली आहे.त्यामुळे प्रशासनावर यामुळे कारवाईसाठी चांगलाच दबाव निर्माण झाला आहे.त्यामुळे आगामी दोन दिवसात प्रशासन काय कारवाई करते याकडे शहर वासीयांचे लक्ष लागून आहे.

कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी दि.१२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला होता.यावर निर्णय घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवून दिली आहे.मात्र तरीही मोठ्या शेडमधील कत्तल थांबली असली तरी आता या व्यवसायातील व कसाई व व्यापाऱ्यांनी आता थेट आपल्या घरातच कत्त्तलखाने बनवून त्या गोवंशाच्या रक्ताचे पाट थेट गोदावरी नदीत काढून दिले आहे.त्यामुळे हे मुजोर खाटीक आता पोलीस आणि नगरपरिषद यांना वाकुल्या दाखवू लागले आहे त्यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

राज्यात सन-२०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.असा कायदा करण्यात आला मात्र हा कायदा केवळ कागदावरच आहे.त्याचे वर्तमानात नगरपरिषद व पोलिसांच्या नाकावर टिच्चून संजयनगर,सुभाषनगर परिसरात सर्रास उल्लंघन सुरू आहे.तीन वर्षांपूर्वी तर ऐन शिवरात्रीच्या दिवशी लाखो रुपयांचे गोवंश नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकून पकडून दिले होते.त्या नंतर वारंवार गोदावरी नदीत कोपरगावात होणाऱ्या गोवंशाच्या कत्तलीचा रक्ताचा महापूर येत असून त्याचा नदीकाठच्या हिंदू देवतावर रक्ताभिषेक होत आहे.मात्र शहर पोलीस व नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करत आहे.त्या निषेधार्थ कोपरगाव नगरपरिषदेवर कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी दि.१२ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला होता.यावर निर्णय घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत ठरवून दिली आहे.मात्र तरीही मोठ्या शेडमधील कत्तल थांबली असली तरी आता या व्यवसायातील व कसाई व व्यापाऱ्यांनी आता थेट आपल्या घरातच कत्त्तलखाने बनवून त्या गोवंशाच्या रक्ताचे पाट थेट गोदावरी नदीत काढून दिले आहे.त्यामुळे हे मुजोर खाटीक आता पोलीस आणि नगरपरिषद यांना वाकुल्या दाखवू लागले आहे त्यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

त्यामुळे या पार्श्वभूमीवर नगरपरिषद हताश होताना पाहायला मिळत आहे.नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी या प्रकरणी शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना एक निवेदन पाठवून याबाबत दाद मागितली आहे.व या प्रकरणी जवळपास ८२ संघटनांनी या विरोधात आवाज उठवला असून कारवाईची मागणी केली असून आता त्यात वकील संघाच्या सदस्यांची भर पडली आहे.त्यांनीही गोदावरी नदीचे पावित्र्य भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.या अगोदर सराला बेटांचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांनी त्या पाठोपाठ श्री क्षेत्र मंजूर येथील श्री शिवानंदगिरीजी महाराज यांनीही इशारा दिला आहे.त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

कोपरगाव वकील संघाने दिलेल्या पाठिंब्याच्या निवेदनावर अध्यक्ष शिरीषकुमार लोहकने,अड.मच्छीन्द्र खिलारी,अड.एम.पी.येवले,अड.ठोळे,अड.बागुल,अड.रक्ताटे आदींचा समावेश आहे.

योग्य प्रचार समितीने दिलेल्या निवेदनावर राखी विसपुते,प्रीती कानकुब्जी,वर्षा वरखेडे,प्रतिमा दरपल,सुवर्णा दरपल,स्मिता कुलकर्णी,कल्पना सोनवणे, रुपाली चाकले, ज्योती वालझाडे,अरुणा वाकचौरे,सायली वाजे,संगीता पंडोरे,मंगल भगत, शीतल आमले,अनिता दातीर,ज्योत्स्ना धामणे, हर्षाली बागड, स्वाती अमृतकर,जया आमले,रंजना भोईर,ज्योती टोरपे, ज्योती काटकर,पल्लवी भगत, शीतल नाईक,गिरीजा कदम,छाया खेमनर,वैशाली साठे,कविता शहा,धनश्री देवरे,राजश्री जाधव,उषा शिंदे आदींच्या सह्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close