गुन्हे विषयक
विद्युत पंप चोरांची टोळी जेरबंद,कोपरगावात १.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषी साधनांपैकी सर्वात महत्वाच्या असणाऱ्या विद्युत पंपावर चोरट्यांची वक्र दृष्टी वळाली होती त्यातून अनेक चोऱ्या झाल्या होत्या मात्र निवडक शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल केले होते.या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यात नुकतेच कोपरगाव तालुका पोलिसांना यश आले असून त्यातील प्रमुख आरोपी महेंद्रसिंग गोपाल सिंग राजपूत (वय-३०),कृष्णा प्रकाश शिंदे (वय-२४),हे चोरीच्या मोटारीचे सुटे भाग विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांना अटक केल्यावर पुढील आरोपी पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्यांना कारागृहाची हवा खावी लागली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान यातील प्रमुख आरोपी महेंद्र सिंग राजपूत या आरोपीवर विदर्भात बुलढाणा,दर्यापूर,मलकापूर,शिर्डी आदी ठिकाणी सहा गुन्हे आढळून आले आहे.तर आरोपी कृष्णा शिंदे यांचेवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे आढळून आले आहे.त्यामुळे पोलिसही चक्राऊन गेले आहे.या अट्टल चोरट्यांना जेरबंद केल्याबद्दल शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर पाणी आणण्याचा किंवा ते वाहून दूर नेण्याचा प्रश्न मानवाने विविध पद्धतींनी सोडविला.या कामासाठी प्रथम मानवी शक्तीचाच उपयोग होणे क्रमप्राप्त होते व तीच योजिली गेली.मात्र नंतर नवनवीन शोध लागत गेले अलीकडील काळात विजेवर चालणारे विद्युत पंप हे विहिरीतील पाणी उपसा करण्याचे प्रभावी साधन मानले जाते.वर्तमान काळात सौर पंप कल्पना उदयाला आली असली तरी विद्युत पंप हा सार्वत्रिक सोय मानली जाते.या पंपावरच वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील चोरट्यानी वक्र दृष्टी गेली होती.त्यातून जेऊर कुंभारी,सोनेवाडी.दहिगाव बोलका,कोकमठाण आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत पंप चोरीस गेल्याचा तक्रारी आल्या होत्या.त्यातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.तर काही शेतकऱ्यांनी पोलीस अधिकारी याना भेटून समक्ष तक्रारी केल्या होत्या.त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले होते.
दरम्यान दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत शिवाजी पुंडलिक काशीद यांची वीरभद्र मंदिराशेजारी असलेली त्याच्या मालकीचा एक विद्युत पंप चोरीस गेला होता.व तो अज्ञात चोरट्याने नेला होता.त्या याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्या बाबत चोरट्यांचा शोध सुरु असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड यांना गोपनीय खबर मिळाली की,”कोपरगाव शहरात एका ठिकाणी काही तरुण जुन्या मोटारी तोडून त्यांचे सुटे भाग करून त्याची स्वस्तात दोनविक्री करत आहेत.त्या वरून पोलिसांचा संशय बळावला व त्या ठिकाणी त्यांनी अचानक धाड टाकली असता त्या ठिकाणी दोन इसम एका स्कुटरवर एक पाणबुडी घेऊन जाताना रंगीहात पकडले होते.त्यात एकाचे नाव गणेश रामनाथ खिलारी (वय-२९) रा.रुई ता.राहाता.हा पकडला होता.त्याला प्रथम अटक केल्यावर त्यांना पोलिसी हिसका दखविल्यावर मोठ्या टोळीचा छडा लागला असून त्यातील आरोपींना अटक करून त्यानां पोलीस कोठडी सुनावली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
प्रमुख आरोपी महेंद्र सिंग राजपूत यांचेकडे सुमारे १० तर आरोपी कृष्णा शिंदे यांचेकडून ०५ विद्युत पंप जप्त केले आहे.तर आरोपी गणेश खिलारी याचे कडून चालू स्थितीत १२ तर मोडतोड केलेल्या ०४,विद्युत पंप मिळून आले आहे. तर ते ने-आण करण्यासाठी दोन दुचाकी मिळून आल्या आहेत.असा एकूण ०१ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना जप्त केला आहे.त्यामुळे आगामी काळात आता या चोऱ्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान यातील महेंद्र सिंग राजपूत या आरोपीवर विदर्भात बुलढाणा,दर्यापूर,मलकापूर,शिर्डी आदी ठिकाणी सहा गुन्हे आढळून आले आहे.
तर आरोपी कृष्णा शिंदे यांचेवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे आढळून आले आहे.त्यामुळे पोलिसही चक्राऊन गेले आहे.
दरम्यान या कामी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,सहाय्यक फौजदार सुरेश गागरे,पोलीस हे.कॉ.राजेन्द्र म्हस्के,आबासाहेब वाखुरे,इरफान शेख,जयदीप गवारे,अंबादास वाघ,रमेश झडे,पो.कॉ.अनिस शेख,अशोक काळे,राघू कोतकर,रशीद शेख,चालक रामचंद्र साळुंखे,सायबर पोलीस ठाण्याचे पो.ना.फुरखान शेख,प्रमोद जाधव आदींनी मोलाची कामगिरी बजावली आहे.याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.