कोपरगाव तालुका
रियाज शेख यांना पितृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील कार्यकर्ते रियाज चांदभाई शेख यांचे पिताश्री चाँदभाई बालमभाई शेख यांचे दि.सोमवार दि.२५ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४:३० वा. दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन मुले,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर पोहेगाव येथील दफनभूमीत शोकाकुल वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला आहे.
पैगंबर वासीं चांदभाई शेख यांनी अत्यंत प्रतिकूल वातावरणात सायकल दुकानाची स्थापना करून त्यातून आपल्या परिवाराला सावरले होते.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ म्हणून पोहेगावात परिसरात परिचित होते.त्यांच्या पच्छात निसार शेख,रियाज शेख,अल्ताब शेख आदी मुले आहेत.