जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..आता साठवण तलावास कोणी अडथळा आणू नये-…या नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाणी प्रश्न आगामी तीस वर्षाच्या कालखंडात कायमचा सोडविण्यासाठी पाच क्रमांकाच्या साठवण तलाव अहंम भूमीका निभावणारा असून त्यासाठी आपण पाठपुरावा करून या तलावाच्या कामास नाशिक येथील जीवन प्राधिकरण विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून १२०.१२ कोटींची तांत्रिक मान्यता मिळवली आहे आता त्या कामात स्वतः अगर कोणाच्या माध्यमातून कोणी खोडा घालू नये असे आवाहन माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत केले आहे.

दरम्यान या प्रसंगी एका पत्रकाराने जुन्या खुल्या नाट्यगृहाचा विषय उपस्थित करून त्या ऐवजी नवीन बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचा पर्यायाबाबत प्रश्न केला असता त्यांनी,”नाट्यगृह करू पण आधी इथले (माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता विकास कामे बंद करण्याचे ) नाटकं आधी थांबवा” अशी कोपरखिळी मारली त्या वेळी उपस्थितांत मोठा हशा पिकला.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांची साठवण क्षमता पुरेशी नसल्यामुळे व मोठया प्रमाणावर गळती,सदोष वितरण व्यवस्था आदी कारणामुळे शहरातील नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदने कोपरगावच्या नागरिकांना २०१६ च्या उन्हाळ्यात तब्बल २३ दिवसांनी व मागील उन्हाळ्यात १५ दिवसांनी पाणी पुरवठा केला आहे.साठवण तलावांची साठवण क्षमता कमी झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी आरक्षित असलेला पाणीसाठा पूर्णपणे उचलला जात नाही.तो केवळ चाळीस ते पन्नास टक्के उचलला जातो.या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे या प्रमुख मागणीसाठी आ.आशुतोष काळे यांनी मागील पाच वर्षात आमरण उपोषण,धरणे आंदोलन व न्यायालयात जाऊन या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांना सातत्याने भेडसावत असणाऱ्या पाणी टंचाईवर नवीन पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणे हा प्रभावी व मूलभूत पर्याय आहे.यापूर्वी कोपरगाव शहरासाठी केंद्र सरकारने ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिलेली होती मात्र त्यावर प्रभावी अंमलबजावणी झालीं नाही.कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अध्यक्ष व खा.शरद पवार यांच्या माध्यमातूनच सुटू शकतो असा विश्वास असल्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी खा.पवार यांना कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालावे असे निवेदन देऊन आवाहन केले होते.आ.काळे निवडणुकीपूर्वी व निवडून आल्यानंतरही सातत्याने चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण व पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी केली होती.व विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी साठवण तलाव क्रमांक पाच मधील माती समृद्धी महामार्गासाठी उचलण्यात यावी अशी मागणी केली होती.मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्यात खोडा घालून नको त्या व अशक्य गोष्टींचे आमिष दाखवून जनतेला झुलवीत ठेवले होते.व पाच क्रमांकाचे तलावातील माती काढण्यापासून संबधीत ठेकेदाराला आडपडद्याने रोखले होते.परिणाम स्वरूप सदर काम बंद पडले होते.मात्र आ.काळे यांची विधानसभेला मोठ्या मताधिक्क्याने वर्णी लागल्याने हा प्रश्नांचा निपटारा होण्याची शक्यता वाढली होती.त्यानुसार त्यांनी तलावातील माती काम निवडून आल्या आल्या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून सुरु केले होते.मात्र माती काढण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागला होता.तर संबंधित कामाची पाहणी करणे,त्याचे अंदाजपत्रक बनवणे,यासाठी पुढील कालावधी लागला होता.त्यानंतर त्यास नुकतीच नाशिक विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे.आता प्रशासकीय मान्यता व आर्थिक मान्यता मिळणे बाकी आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी आज गौतम सहकारी बँकेच्या सभागृहत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादीचे नगरपरिषद गटनेते विरेन बोरावके,शहराध्यक्ष सुनील गंगूले,सेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,माजी शहराध्यक्ष भरत मोरे,माजी नगरसेवक दिनार कुदळे,रमेश गवळी,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,संदीप पगारे,सुनील शिलेदार, दिनकर खरे,आदींसह बहुसंखने कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”हि नूतन योजना पाणी गळती व वितरण व्यवस्था सुधारणे व जवळपास १०५ कि. मी.वितरण व्यवस्था दुरुस्ती करणेसह नवीन हद्दीवाढीतील गोरोबानगर, अंबिकानगर,लक्ष्मीनगर,ब्रिजलालनगर आदी उपनगरांना पाणी पुरवठा करणे व उंच टाक्या बांधणे. जुनी शुद्धीकरण यंत्रणा दुरुस्ती करणे आदि कामे करण्यात येणार आहे.पाच क्रमांकाचे तलावाचे काम आधीच सुमारे चार मिटर पर्यंत केले असून त्यातून जवळपास सात कोटी रुपयांची बचत केली आहे.यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादीसह सर्व नगरसेवक,मुख्याधिकारी,प्रशासन आदींचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान काही लोक बंदिस्त जलवाहिणीबद्दल विनाकारण अफवा पसरवून जनतेत गैरसमज करत आहे.ते आरोप धांदात खोटे आहेत असे सांगून,”जी बाब सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात विद्यमान आहे.त्या बद्दल यांनी मत प्रदर्शन करण्यास असमर्थता दर्शविली आहे.मात्र काही माध्यम प्रतिनिधी प्रवक्ता असल्यागत खोदून-खोदून विचारणा करत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांना आडपडद्याने,”तुम्ही, या कामात अडथळा आणू नका म्हणजे झाली” अशी कोपरखिळी मारली आहे. बाकी प्रश्नाबाबत त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close