कोपरगाव तालुका
विद्यार्थ्यांनी हिंदीचे ज्ञान प्राप्त करून आपले भविष्य घडवावे-कवयित्री खटाटे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी हिंदीचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करून आपापले भविष्य घडवावे.” असे प्रतिपादन विश्व हिंदी महासभेच्या सदस्य आणि कवयित्री मनीषा खटाटे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहरातील के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व आय.क्यु.ए.सी.विभागाच्या विद्यमाने “विश्व साहित्य के परिदृश में हिंदी साहित्य का योगदान एवं रोजगार के अवसर” या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष प्रासंगिक व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या.त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसाटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”हिंदी स्वतंत्र भारताची राजभाषा,राष्ट्रभाषा व प्रमुख संपर्क भाषा आहे.हिंदी भाषेला हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे.कविते बरोबरच हिंदी मध्ये शेकडो कालजयी रचना प्रसिद्ध आहेत. अशी ही हिंदी भाषा आज जगाची भाषा होऊ पाहाते आहे.त्यामुळे हिंदीचे सौंदर्य जपतानाच त्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होत आहेत.म्हणूनच विद्यार्थ्यांनी हिंदीचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करून आपापले भविष्य घडवावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.