गुन्हे विषयक
कोपरगावात महिलेचे गंठण पळविले,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती संगीता गणेश देशमुख (वय-५४) रा.साईनगर या सकाळी आपल्या कर्तव्यावर जाऊन आपली दुचाकी लावत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरट्यानी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास ६० हजार रुपये किमतीचे सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे गंठण पळविले आहे.त्यामुळे शहरातील महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
साईनगर या उपनगरातील फिर्यादी महिला या कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शिक्षिका आहेत.त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून साईनगर येथील घरून निघाल्या व शाळेत पोहचल्या असताना त्यांनी आपली दुचाकी हि शाळेच्या आवारात लावण्यासाठी गाडी लावण्याच्या थांब्यावर थांबवली असताना त्यांच्या मागावर व सावज टिपण्याचा तयारीत असलेल्या व आपल्या तोंडावर मुखपट्टी बांधलेल्या चोरट्यानी हा साठ हजाऱ्यांच्या गंठणावर डल्ला मारला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे बदलून कोपरगाव शहरात आल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांचे गंठण ओरबाडून पळविणाऱ्या टोळ्यांचे बऱ्यापैकी उच्चाटन झाले होते.त्यांचा धाक बऱ्यापैकी या चोरट्यानी घेतला होता.मात्र आता पूर्ववत या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.मात्र ते बदलून नगर येथे गेल्यावर मात्र चोरट्यानी आपल्या लीला पुन्हा हळूहळू सुरु केल्या असल्याचे दिसून येऊ लागले आहे.अशीच घटना आज कोपरगाव शहरात घडली आहे.साईनगर या उपनगरातील फिर्यादी महिला संगीता देशमुख या कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शिक्षिका आहेत.त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून साईनगर येथील घरून निघाल्या व शाळेत पोहचल्या असताना त्यांनी आपली दुचाकी हि शाळेच्या आवारात लावण्यासाठी गाडी लावण्याच्या थांब्यावर थांबवली असताना त्यांच्या मागावर व सावज टिपण्याचा तयारीत असलेल्या व आपल्या तोंडावर मुखपट्टी बांधलेल्या अंदाजे वय-२० ते २५ वर्ष वय असलेल्या दोन चोरट्यानी संधी साधत त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीच्या दीड तोळा सोन्याच्या गंठणावर डल्ला मारून आपल्या काळ्या रंगाच्या शाईन दुचाकीवरून पोबारा केला आहे.त्यातील पाठीमागे बसलेल्या आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट,आकाशी रंगाची पॅन्ट व डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातलेली होती.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे आदींनी भेट देऊन पाहणी केली असून फिर्यादिस दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.क्रं.२९३/२०२१ भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.