कोपरगाव तालुका
कोपरगावात महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी,चौकशीसाठी कोपरगावात समिती !
न्यूजसेवा
कोपरगांव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगर परिषद कार्यालयात आज महिलांच्या लैगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी मीना कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा प्राप्त होणार आहे.
सन-१९९७ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विशाखा मार्गदर्शक सूचनांनंतरही कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ व शोषणाविरुद्ध स्वतंत्र कायदा होण्यास तब्बल १६ वर्षे लागली.२०१३ साली भारतात ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ (प्रतिबंध, मनाई आणि तक्रारनिवारण) कायदा अंमलात आला आहे.त्याची अमंलबजावणी आता कोपरगाव नगरपरिषदेत सुरु झाली आहे.
भंवरीदेवीच्या खटल्याचा परिपाक म्हणून विशाखा मार्गदर्शक सूचना अस्तित्वात आल्या आहेत.त्यायोगे प्रथमच ‘वर्किंग वुमन’च्या लैंगिक शोषण व छळाचा प्रश्न भारतात पहिल्यांदाच ‘समस्या’ म्हणून मान्यता पावला,तरीही महिलांच्या लैंगिक छळाची तक्रार आल्यास एकतर कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ,असे त्याचे स्वरूप या पूर्वी लक्षात घेतले जात नसे किंवा तक्रार आल्यावरच अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत,याची कुणाला आठवण होत असे.१९९७ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विशाखा मार्गदर्शक सूचनांनंतरही कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ व शोषणाविरुद्ध स्वतंत्र कायदा होण्यास तब्बल १६ वर्षे लागली.२०१३ साली भारतात ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ (प्रतिबंध, मनाई आणि तक्रारनिवारण) कायदा अंमलात आला आहे.
हा कायदा महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निकोप स्पर्धेत जिंकण्यास मदत व्हावी म्हणून नाही,तर महिलांना अशा निकोप स्पर्धेत भाग घेण्यास केवळ त्यांचे ‘महिला’ असणे आड येऊ नये यासाठी आहे.महिलांना त्या केवळ महिला आहेत म्हणून पूर्वग्रहदूषित गृहितकांना तोंड द्यावे न लागता,निकोप स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळावी म्हणून हा कायदा अस्तित्वात आला आहे.त्याची अमंलबजावणी व्हावी असा आदेश नुकताच पालिकेला प्राप्त झाला होता.त्या साठी हि समिती गठीत करण्यात आली आहे.त्या कायद्याअंतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी हि समिती स्थापन करण्यात आली आहे.त्या समितीची अंतर्गत तक्रार समितीची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,कोपरगाव नगर परिषद अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्षा मीना कदम व इतर सदस्य वैशाली झाल्टे,अॅड शीतल देशमुख,डॉ.महेश आहेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.