जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना उपचार केंद्रासाठी एक लाखांचा निधी प्रदान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांना केलेल्या आवाहनाप्रमाणे प्रतिसाद मिळून त्यातून एक लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला होता.त्यातील ५० हजार रुपयांचा कोरोना उपचार केंद्रासाठी निधी नुकताच आ.काळे यांचेकडे तर उर्वरित कोल्हे यांचेकडे सुपूर्त करण्यात आला आहे.शिक्षक संघटनेने कोपरगावातील दोघां राजकीय गटांना खूश ठेवण्याचे कसब साधले असल्याचे दिसून येत आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एकुण एक लाखांच्या निधी पैकी ५० हजार रुपयांचा धनादेश नुकताच कोपरगावातील आ.काळे समर्थक कोरोना उपचार केंद्रास सुपूर्त करण्यात आला आहे.तर उर्वरित ५० हजार रुपयांचा धनादेश हा माजी मंत्री कोल्हे समर्थक कोरोना उपचार केंद्रास सुपूर्त केला आहे.मात्र सर्वाधिक कोरोना रुग्णावर उपचार करून जीवन देणाऱ्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्र उपेक्षित का राहिले ? हे समजायला मार्ग नाही.

राज्यात आज ५ हजार ०३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ०४ हजार ३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
राज्यात आज २१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. तब्बल ३५ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.राज्यात सध्या ५० हजार १८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.विषाणू तज्ज्ञांनी अद्याप तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असल्याने अद्याप धोका टळलेला नाही हे उघड आहे.त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथील माध्यमिक शिक्षक संघटनेनें आरोग्य उपचाहर केंद्रास मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्या साठी त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन केले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून एक लाख रुपयांचा निधी संकलित झाला आहे.त्यातील ५० हजार रुपयांचा धनादेश नुकताच कोपरगावातील आ.काळे समर्थक कोरोना उपचार केंद्रास सुपूर्त करण्यात आला आहे.तर उर्वरित ५० हजार रुपयांचा धनादेश हा माजी मंत्री कोल्हे समर्थक कोरोना उपचार केंद्रास सुपूर्त केला आहे.मात्र सर्वाधिक कोरोना रुग्णावर उपचार करून जीवन देणाऱ्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्र उपेक्षित का राहिले ? हे समजायला मार्ग नाही.
यावेळी कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ शिक्षक नामदेवराव सोनवणे,शंकरराव जोर्वेकर,सुरेश बोळीज,गजानन शेटे,कर्णासाहेब शिंदे,तालुका अध्यक्ष विलासराव वाकचौरे,सचिव नरेंद्र ठाकरे,अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर,जिल्हा प्रतिनिधी रामदास गायकवाड,अरुण बोरनरे,तालुका कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण निळकंठ,भास्कर काजळे,भाऊसाहेब माने,मनोहर म्हैसमाळे,रमेश मोरे,दिपक भोये,उमेश पवार,अतुल कोताडे आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचलन रामदास गायकवाड यांनी केले.तर उप्पस्थितांचे आभार नरेंद्र ठाकरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close