जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

पोहेगाव जिल्हा परिषद गटात कोरोना रुग्णांचा उच्चांक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण लक्षणीयरीत्या घटल्यानंतर नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढले असून त्यात काकडी ग्रामपंचायत अंतर्गत डांगेवाडी,मल्हारवाडी परिसरातील दुष्काळी तेरा गावात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढले असल्याचे प्रथम वृत्त आमच्या प्रतिनिधीने दिले होते ते तंतोतंत खरे ठरले असून आज आलेल्या आकडेवारीनुसार एकट्या काकडी गावात १४ रुग्ण आढळले आहे.त्यात मल्हारवाडीतील ०५ रुग्णांचा समावेश आहे.तर पोहेगावात १३ रुग्ण निष्पन झाले आहे.तर जवळके,अंजनापूर प्रत्येकी ०२,मनेगाव व शहापूर प्रत्येकी ०१,आदी ३३ रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे पोहेगाव गटात भीतीचे वातावरण पसरले आहे.हि रुग्णवाढ रोखण्यासाठी ग्रामस्थांनी गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४९० रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ११ रुग्ण बाधित आढळले असून ४७९ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५७५ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०२ तर अँटीजन तपासणीत ११ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०१ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण १४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नसल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील आकडेवारी खेरीज तालुक्यात येसगाव,सुरेगाव,दहिगाव बोलका प्रत्येकी ०६ रुग्ण,टाकळी ०५,कासली-०४,घोयगाव वेळापूर,जेऊर कुंभारी प्रत्येकी ०३ रुग्ण,अंजनापूर,जवळके वारी,कोळपेवाडी प्रत्येकी-०२ तर कोकमठाण,चासनळी,संवत्सर,तळेगाव मळे, आपेगाव,भोजडे,डाऊच खुर्द मनेगाव,मळेगाव थडी,शहापूर,खिर्डी गणेश प्रत्येकी-०१,रुग्ण बाधित आढळले असून तालुक्यात एकूण १०७ रुग्ण सक्रिय असून यातील सरकारी रुग्णालायत-४८ तर ०८ रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ०५ हजार २८८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ५७५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९४ हजार २१२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ५०० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.लग्न,दहावे,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत. कोपरगाव तालुक्यातील काकडी,मल्हारवाडी,डांगेवाडी,पोहेगाव,मनेगाव आदी ठिकाणी रुग्ण लक्षणीयरित्या वाढले आहे हि चिंतेची बाब आहे.याबाबत प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागतील अशी चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close