कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कोरोना तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायत हद्दीत नुकत्याच कोरोना बाधित आलेल्या रुग्णाच्या गल्लीमधे रॅपीड अॅंटीजन तपासणी शिबिर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने घेण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व त्या प्रभागातील संशयित नागरिकांची तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याची भूमिका घेतली असून तालुक्यातील नाटेगाव येथील हद्दीत असे शिबिर नुकतेच घेण्यात आले आहे.त्याला ग्रामस्थांनी प्रतीसाद दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात आज अखेर १२ हजार ६८५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १३४ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ०८ हजार ०२५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०४ लाख ३२ हजार १०० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ११.७४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.३२ टक्के असल्याची माहिती उपलब्ध झाली असून रुग्णसंख्या वाढल्याने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व त्या प्रभागातील संशयित नागरिकांची तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याची भूमिका घेतली असून तालुक्यातील नाटेगाव येथील हद्दीत असे शिबिर नुकतेच घेण्यात आले आहे.त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी पावले उचलली आहे.त्यासाठी कोरोना रूग्ण लवकरात लवकर शोधुन कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी ‘तालुका टास्क फोर्स कोरोना नियंत्रण समिती’स्थापन केली आहे.त्या मार्फत बाधित रुग्णाच्या भोवतालच्या घरांमधे कोरोना तपासणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आज नाटेगाव येथे ८० जणांची तपासणी करण्यात आली आहे. सदर ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते उपस्थित होते.
सदर प्रसंगी नाटेगावचे सरपंच विकास मोरे,उपसरपंच ताराचंद मोरे यांनी नागरिकांना तपासणी करण्यासाठी संशयित नागरिकांना आणण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. सदर संशयित रुग्णाच्या तपासण्या एम.पी.डब्ल्यू .जवादे आणि ए.एन.एम श्रीमती वाघ आणि आशा स्वयंसेविका यांनी केल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.