कोपरगाव तालुका
कोपरगावातील…या विक्रमी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तामिळनाडू येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम संस्थेच्या वतीने फेम टू सॅटॅलाइट उपग्रह तयार करण्यासाठी भारतातून एक हजार विद्यार्थ्यांची निवड केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील कु.सिद्धी अतुल बोधे व समाधान लोहकरे या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”तामिळनाडू येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम संस्थेच्या वतीने फेम टू सॅटॅलाइट उपग्रह तयार करण्यासाठी भारतातून एक हजार विद्यार्थ्यांची निवड केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील कु.सिद्धी अतुल बोधे व समाधान लोहकरे या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या उपक्रमात दहा-दहा विद्यार्थ्यांच्या १०० समूहाने १०० फेम टू सॅटॅलाइट बनवले व १०० सॅटॅलाइट एकाच वेळी प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम केला होता. या विक्रमाची जगातील विविध संस्थानी दखल घेतली असून या विद्यार्थ्यांना या उपक्रमातील सहभागाबद्दल असिस्ट वर्ड रेकॉर्ड,वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच स्पेस ऑफ इंडिया अशा विविध नामांकित संस्थांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल आपल्या तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.
या सत्कार कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे,सुजित रोहमारे यांनी सत्कार मूर्तीचा सत्कार केला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोनवणे बी.आर.यांनी केले.माजी उपप्राचार्य बारे एन.जी.,कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ.के.एल.गिरमकर उपस्थित होते. तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी. एस.बुधवंत यांनी व आभार ए. एफ.सूर्यवंशी यांनी केले.