जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उच्च न्यायालयात कोपरगावचे जनतेच्या वतीने देणार आव्हान-इशारा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या एका नगरसेवकाने शहराच्या २८ विकास कामात भ्रष्टाचार होणार म्हणून उच्च न्यायालयात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देत विकास कामांना मनाई हूकूम मिळवला.हि याचिका म्हणजे राजकीय डावपेच कि वाट्या वरून भांडण हेच समजत नसल्याचे सूतोवाच करून गत पाच वर्षात अनेक विकास कामात जास्त पैसे मंजूर झाले,कामे निकृष्ट झाले पण कुणी नगरसेवक न्यायालयात का गेले नाही ? असा तिखट सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी एका प्रसिद्धि पत्रकांवये केला आहे.

“नगरसेवक निखाडे यांचे प्रभागात आचारी हॉस्पीटल ते साई नगर रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले.काम चालू असताना ते स्वत: डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे होते पण वीस लाखाच्या काँक्रीटला तीन महीन्यात आडवे उभे तडे गेले.तीन वर्षापुर्वी ह्याच रस्त्याचे काम नऊ लाख रूपयांना झाले होते.त्या डांबरीकरणावर नवीन डांबरीकरण होऊन देखील रस्ता उखडला,त्याचे मुळ कोण ?-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते.

कोपरगाव नगरपरिषदेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विविध रस्त्यांसह अठ्ठावीस कामे राजकीय कारणातून अडवून धरल्याने याबाबत वाद नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी साधारण फेब्रुवारी महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे नेला होता.त्या बाबत सुनावणी पूर्ण झाली होती त्या बाबतचा निकाल जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दि.२३ मार्च रोजी जाहीर केला होता.त्या बाबत कामाचे आदेश संबंधित ठेकेदारांना होऊन त्यांनी जवळपास बहुतेक कामांना प्रारंभ केला होता.मात्र अस्वस्थ कोल्हे गटाच्या हा विषय पचनी पडला नाही व त्यांनी या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्या निकालाला दि.२५ जून रोजी आव्हान दिले आहे.व त्या स्थिगितीचे आदेश नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे पदाधिकारी व माजी पदाधिकारी यांनी या आदेशाची प्रत ३० जून रोजी स्वहस्ते दिली आहे.त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.त्याबाबत आगामी २३ जुलै रोजी सुनावणी होणार असून या पार्श्वभूमीवर संजय काळे यांनी या बाबत आपली भूमिका साडेतोडपणे मांडली आहे.

त्यात यांनी पुढे म्हटले आहे की,”नगरसेवक निखाडे यांचे प्रभागात आचारी हॉस्पीटल ते साई नगर रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले.काम चालू असताना ते स्वत: डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे होते पण वीस लाखाच्या काँक्रीटला तीन महीन्यात आडवे उभे तडे गेले.तीन वर्षापुर्वी ह्याच रस्त्याचे काम नऊ लाख रूपयांना झाले होते.त्या डांबरीकरणावर नवीन डांबरीकरण होऊन देखील रस्ता उखडला.त्याचे मुळ कोण ? आता माझ्या तक्रारी नंतर काँक्रीटवर निकृष्ट डांबरीकरणाचा मुलामा लावला आहे.भ्रष्टाचार व निकृष्ट कामे नागरीकांसाठी नवी नाहीत २०१५ ला नगरपरिषदेत सत्ता बदलापूर्वी झालेल्या दहा रस्त्यांच्या कामात मोठा नीधी खर्च झाला.पण सगळे रस्ते खड्डे मय झालेत.नक्की भ्रष्टाचार कुणी केला.विजय वहाडणे नगराध्यक्ष झालेत.जनतेने वर्गणी करून पैसे देऊन निवडून दिले.झालेल्या भ्रष्टाचारावर त्यांनी रेशमी चादर घातली.व नवीन होणारी कामे निकृष्ट करण्याचा पायंडा त्यांनी तसाच ठेवला.”ना खाऊंगा ना खाणे दुंगा?” हे घोषवाक्य केवळ नावपूरतेच उरले आहे.

आज कोपरगाव शहराची अवस्था दयनींय झाली आहे.एक काम गुणवत्तेत होत नाही.नेत्यांच्या टोळ्या तयार आहेत.पण आजवर कोणताच नेता गुणवत्ते बाबत आग्रही नाही.त्याचे गौडबंगाल समजायला मार्ग नाही.कोपरगाव शहरातील जनतेला आता निकृष्ट कामांची सवय झाली.त्यामुळे केवळ दोन महीने टिकेल असे हि २८ कामे प्रत्यक्षात होऊ द्या.उच्च न्यायालयात आपण शहराची बाजू मांडणार आहे.सार्वजनीक बांधकाम विभागाच्या निरिक्षणात सगळी विकास कामे त्वरीत व गुणवत्तेत पुर्ण व्हावीत.जर अंदाजपत्रके अवास्तव असतील तर वाजवीच बीले द्यावीत.अवास्तव अंदाज पत्रके जर सिध्द होत असतील तर नगरपरिषदचे मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागणार आहे.त्यासाठी शहराच्या वतीने आपण नगरसेवकाच्या याचिकेत आपले म्हणणे (इंटरव्हेन्शन) दाखल करणार आहे.कोपरगाव नगराचे नरक झाले आहे.नरक सेवका ऐवजी नरकाचे नगर करून नगरसेवक व्हा असे आवाहनही माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close