जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

परतीचे दोर कापले गेल्याने निळवंडे कालव्यांचे काम करत असल्याचा बनाव-अड्.खालकर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सुरु असून निधीची तरतूद राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली असून आगामी वर्षाच्या मध्यावर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार असून यात निळवंडे कालवा समितीचे मोठे योगदान असून यात प्रवरा काठच्या व भाजपात जाऊन पावन झालेल्या कोपरगावातील आजी-माजी मंत्री व माजी आमदारांचे कवडीचेही योगदान नसून उलट त्यांनी या पाण्यावर डल्ला मारण्याची एकही कसर सोडली नसल्याची टीका निळवंडे कालवा समितीचे कार्यकर्ते अड्.योगेश खालकर यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

निळवंडे कालवा कृती समितीने अड्.अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवला आहे.त्यामुळे या कोल्हेकुई करणाऱ्या नेत्यांचे परतीचे दोर कापले गेल्याने यांच्या हाती आज प्रगती पथावर असलेल्या कालव्यांवर जाऊन फोटो काढण्यापालिकडे काही राहिले नाही त्यामुळे हा देखावा निर्माण करण्याचे काम आजी-माजी मंत्री करत असून निधी आणण्याचे काम हे राहुरीतील माजी खा.प्रसाद तनपुरे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे जलसंपदा मंत्र्यांकडून करत आहे”-अड्.योगेश खालकर.निळवंडे कालवा कृती समिती.

कोपरगाव नगरपरिषेची निवडणूक आगामी नोव्हेम्बर महिन्यात येऊन ठेपली आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काळात निळवंडे या विषयावर पुन्हा एकदा कोपरगावात निवडणुकीचा आखाडा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.भाजपच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात आले असून कोपरगाव येथे नगर-मनमाड मार्गावर साईबाबा चौफुलीवर कोपरगाव तालुका भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या ओ.बी.सी.चे आरक्षण या विषयावर “चक्काजाम”आंदोलन आयोजित केले असतांना माजी आ.कोल्हे व त्यांचे युवराज विवेक कोल्हे यांनी निळवंडेच्या बंदिस्त जलवाहिनींच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेल्या विषयावर दुष्काळी जनतेप्रति गरळ ओकले आहे. व कालवा समितीच्या न्यायिक लढ्यावर टीका केली होती.या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते अड् खालकर यांनी आपले प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात हि भूमिका मांडली आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,निळवंडे धरणाची १४ जुलै १९७० ला पहिली मंजुरी मिळाली त्या नंतर या प्रकल्पावर चार सुधारित प्रशासकीय मंजुऱ्या मिळाल्या आहे.व या प्रकल्पाची किंमत ७.९३ कोटीवरून २ हजार २३२ कोटींवर गेली आहे.हा पराक्रम कोणाच्या आशीर्वादाने झाला आहे.व कोणी-कोणी निवडणुका रंगवल्या आहे.व आपल्या सत्तेची पोळी भाजून घेतली आहे.हे सर्व दुष्काळी जनतेला व शेतकऱ्यांना माहिती आहे.मधल्या काळात उजनीचे गाजर दाखवून अनेकांनी आपल्या निवडणुकीची बेगमी केली खोटी उदघाटने केली हे दुष्काळी शेतकरी विसरलेले नाही.उलट या गावांना पिण्याचे व शेतीचे पाणी देण्याऐवजी या गावांचे पाणी आरक्षण विधानसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून देऊनही करून दिले नाही.पण आपल्या दारू कारखान्यासाठी डल्ला मारण्यास हि मंडळी विसरली नाही.पंधरा टक्के आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून शेतकरी व कोपरगावचे नागरिक यांची दिशाभूल करण्याचे पातक हि मंडळी करत आहे.यांना या शेतकऱ्यांच्या पाण्यावर दारूसाठी डल्ला मारण्यास थोडीही शरम वाटत नाही.शिर्डीचे व कोपरगाव शहरातील महिलांचा डोक्यावरील हंडा डोक्यावरून उतरविण्याचे नाव घेऊन आपला कुटील डाव साध्य करण्याचे काम हि मंडळी राजरोस करत आहे.हा डाव ओळ्खल्यानेच दुष्काळी तेरा गावांनी त्यांच्या पापाचे माप दीड वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या निवडणुकीत टाकले आहे.

निळवंडे कालवा कृती समितीने अड्.अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवला आहे.त्यामुळे या कोल्हेकुई करणाऱ्या नेत्यांचे परतीचे दोर कापले गेल्याने यांच्या हाती आज प्रगती पथावर असलेल्या कालव्यांवर जाऊन फोटो काढण्यापालिकडे काही राहिले नाही त्यामुळे हे आजी-माजी मंत्री आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम करत असून निधी आणण्याचे काम हे राहुरीतील माजी खा.प्रसाद तनपुरे व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे जलसंपदा मंत्र्यांकडून करत आहे.असे असताना गाडी खाली चालणाऱ्या ग्रामसिंहा सारखे काही आपणच गाडी ओढत असल्याचे आभासी चित्र हि मंडळी राजरोस दाखवत आहे.मात्र वास्तव दुष्काळी जनतेला माहिती आहे.बंद पेपर मिलच्या नावावर कोण पाणी चोरून वापरत आहे याची पोलखोल यापूर्वीच कालवा समितीने सप्रमाण केली आहे.तर काही बदनाम समित्यांचा वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

या बाबत आता उच्च न्यायालयात या पाणी चोरीवर श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.तरीही हि मंडळी भानावर यायला तयार नाही याचे अप्रूप वाटत असून त्यांचा राजकारणातील सराईत पणा ठळकपणे दिसून येत असल्याचेही अड्.खालकर यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close