जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जनतेच्या विश्वासानेच तालुक्यात विकास कामांना प्राधान्य-समाधान

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्ये गत निवडणुकीत जनतेने मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यानेच तालुक्यात आपल्याला अनेक विकासकामे करता आली आहे.व त्याचा लाभ गरजू नागरिकांना मिळाला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या विविध योजनेंतर्गत एकूण ३७ लाख ९२ हजार रुपये निधीतून पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधणे,जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खोली बांधणे व नागरी सुविधा केंद्र बांधकाम करणे आदी कामांचे भूमिपूजन आ.काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सरपंच सुर्यभान कोळपे,उपसरपंच डॉ.प्रकाश कोळपे, शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधु कोळपे,राहुल रोहमारे,कचरू कोळपे,राहुल जगधने,डॉ.आय.के.सय्यद,ज्ञानेश्वर हाळनोर,ज्ञानेश्वर कोळपे,वसंतराव कोळपे, हौशीराम कोळपे,महेश कोळपे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वच सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणावा एवढीच अपेक्षा होती ती अपेक्षा सर्वच सदस्यांनी पूर्ण केल्याचा दावा करून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली याचा आनंद वाटतो.तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता दिली,आपल्याला विधानसभेत पाठविले त्यामुळे तुम्ही टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाला प्राधान्य दिले आहे.यापुढेदेखील लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचे तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही दिली. कोळपेवाडीसह इतरही गावांच्या पाणी योजनेचे प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु असून तलावाचे सुशोभिकरण व संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी जि.प.राजेश परजणे,राहुल रोहमारे,डॉ.आय.के.सय्यद यांनी त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर आभार डॉ.प्रकाश कोळपे यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close