जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या साठवण तलावाला विरोध कोणाचा हे जनतेला माहिती-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायम सोडवायचा असेल तर पाच नंबर साठवण तलाव महत्वाचा असून त्यासाठी ना.गडकरी व पवार यांचे सहकार्य असून या कामाला विरोध कोणाचाच आहे हे शहरातील नागरिकांना चांगलेच माहिती असल्याची कोपरखिळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता मारली आहे.

“कोपरगाव शहराची पिण्याच्या पाण्याची गरज दूर व्हावी व तलाव व्हावा यासाठी आपण स्वतः नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची व भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमवेत भेट घेतली.पाच नंबर साठवण तलाव मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या “गायत्री” कंपनीच्या माध्यमातून दूर करण्यासाठी दुरावस्था अवगत केली होती.त्यांनीही त्वरित दखल घेऊन ‘गायत्रीच्या’ रेड्डी यांना हैदराबादला फोन लावून खोदकाम करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार त्यांनी खोदकामही सुरू केले होते”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषेची निवडणूक आगामी नोव्हेम्बर महिन्यात येऊन ठेपली आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काळात निळवंडे या विषयावर पुन्हा एकदा कोपरगावात निवडणुकीचा आखाडा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.भाजपने नुकत्याच साईबाबा चौफुलीवर आयोजित केलेल्या ओ.बी.सी.चे आरक्षण या विषयावर “चक्काजाम”आंदोलन आयोजित केले असतांना माजी आ.कोल्हे व त्यांचे युवराज विवेक कोल्हे यांनी निळवंडेच्या बंदिस्त जलवाहिनींच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेल्या विषयावर आपला वेळ वाया घालवून उपस्थितांना धक्का दिला होता.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपले प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात हि भूमिका मांडली आहे.
त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”भविष्यात कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यात पाच नंबर साठवण तलाव अहंम भूमिका निभावणार असून तो तलाव व्हावा यासाठी आपण स्वतः नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची व भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमवेत भेट घेतली.पाच नंबर साठवण तलाव मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचे काम करणाऱ्या “गायत्री” कंपनीच्या माध्यमातून व्हावा यासाठी कोपरगाव शहराच्या पाण्याची भीषण दुरावस्था अवगत केली होती.त्यांनीही त्वरित दखल घेऊन ‘गायत्रीच्या’ रेड्डी यांना हैदराबादला फोन लावून खोदकाम करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार त्यांनी खोदकामही सुरू केले.त्या अगोदर संजय काळे,नितीन शिंदे यांचेसह शिर्डी येथे श्री.रेड्डी यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती.पण त्यांनतर पाच नंबर तलावाचे काम सुस्तावले.त्या कामात कोण आडवे पडले,गायत्री कंपनीवर कुणी दबाव आणला हे जनतेला माहित आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत या विषयावर खूप चर्वितचर्वण होऊन आ.आशुतोष काळे निवडून आले.त्यांनी शरद पवार यांचेकडे पाठपुरावा करून हे काम पुन्हा सुरू केले.आता पाच नंबर साठवण तलाव ( सिमेंट काँक्रीट) व संबंधित कामाचे इस्टीमेट तयार करून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.आपल्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पाठपुरावा करू शकतो,पण पाच वर्षे राज्यात व देशातही भाजपाची सत्ता असतांना भाजपाच्या त्यावेळच्या आमदारांना हे का जमले नाही? असा तिखट सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी विचारला आहे.व भाजपच्या माजी आमदारांना केवळ फक्त अडथळे आणण्याचे काम जमत असल्याची कोपरखिळी मारली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close